मनपा निवडणूक : मालेगावात त्रिशंकू अवस्था, कुणाला मिळणार सत्तेच्या चाव्या?
By admin | Published: May 26, 2017 10:52 AM2017-05-26T10:52:52+5:302017-05-26T15:21:55+5:30
मालेगाव महानगरपालिकेत आतापर्यंत राष्टवादी काँग्रेसने 11 जागांवर विजय मिळवला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मालेगाव (नाशिक), दि. 26 - मालेगाव महानगरपालिकेत आतापर्यंत राष्टवादी काँग्रेसने 11 जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेनेनंही 13 जागांवर मुसंडी मारत आघाडी घेतली आहे.
प्रभाग 14 मधून राष्टवादी काँग्रेसचे जैबुन्नीसा समसुद्दोहा, अख्तरून्नीसा मो. आरीफ सलोटी, नबी अहमद अहमदुल्ला, अमानतुल्ला पीर मोहम्मद.
तर प्रभाग 12 मधून शेख कलीम दिलावर, आसेफा राशीद अहमद, अन्सारी साजेदा रशीद हे उमेदवार विजयी झाले आहेत.
याच प्रभागातून जनता दलाचे बुलंद एकबाल निहाल अहमद निवडून आले आहेत. मतमोजणी सुरू असून मतमोजणी केंद्रांभोवती उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी केली आहे. प्रभाग क्रमांक - 16 मध्ये ही राष्ट्रवादीचे चारही उमेदवार आघाडीवर आहेत.
याठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे.
मतमोजणी केंद्रांभोवती उमेदवारांनी समर्थकांसह गर्दी केली असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुधवारी मालेगाव महानगरपालिकेसाठी 60 टक्के मतदान झाले होते.
सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला असून कॅम्परोडच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या नवीन इमारतीत १, २, ८, ९, १०, ११ या प्रभागांची, शिवाजी जिमखान्यात १२, १५, १७, १८, २० व २१ या प्रभागांची, तालुका क्रीडा संकुलात ५, ६, ७, जाखोट्या भवनात १४, १६, १९ तर श्रीकृष्ण लॉन्समध्ये ३, ४, १३ या प्रभागांच्या मतमोजणीस प्रारंभ झाला आहे.
LIVE UPDATES
प्रभाग 19 ब : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बेग शाहीन मन्नान बेग या अवघ्या 25 मतांनी पराभूत झाल्याने फेर मतमोजणीची मागणी. निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी मागणी मान्य केल्याने थोड्याच वेळात होणार फेरमतमोजणी.
मालेगावचे विद्यमान महापौर हाजी मो इब्राहिम यांचा दारुण पराभव
मालेगाव (नाशिक) - प्रभाग 14 मध्ये चारही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी
मालेगाव (नाशिक जिल्हा ) महापालिका
एकूण जागा - 84
बिनविरोध - 01 ( काँग्रेस)
जाहीर झालेले निकाल
राष्ट्रवादी काँग्रेस - 11
जनता दल - 5
काँग्रेस - 4
आघाडी
काँग्रेस - 28
राष्ट्रवादी काँग्रेस - 20
शिवसेना - 13
भाजपा - 09
एमआयएम - 07
इतर - 07