मनपा कर्मचाऱ्याचा स्वाइन फ्लूने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:05 AM2018-08-04T01:05:47+5:302018-08-04T01:06:03+5:30
नाशिक : शहरातील रोगराई वाढत असून, डेंग्यूचे रुग्ण कमी होण्याचे नाव घेत नसताना महापालिकेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी यांच्या वाहनचालकाचाच स्वाइन फ्लूनेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे मेट्रोपोलीस लॅबचा अहवाल महापालिका प्रशासनाने मान्य केला आहे. शहरात आतापर्यंत पाच जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट आहे.

शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलजन्य आजाराबरोबरच अन्य आजारांची लागण वाढत असून, केवळ डेंग्यूचे सव्वादोनशे रुग्ण आहेत. वडाळा परिसरात चिकुनगुन्याचे पंधराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यात आता स्वाइन फ्लूनेदेखील डोके वर काढले आहे.
महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी यांचे मनपाचे वाहनचालक असलेल्या गायकवाड यांचा दि. ३१ जुलै रोजी स्वाइन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाला. गायकवाड यांना स्वाइन फ्ल्यू झाल्याचे निदान मेट्रोपोलीस लॅबने केले आहे. पुण्याच्या विषाणू संशोधन संस्था या शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय महापालिका कोणत्याही आजाराला दुजोरा देत नसून गायकवाड यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान करता येत नसल्याने मृत गायकवाड यांचे स्वॅप नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र, मेट्रोपोलीस लॅबही खासगी शासन नोंदणीकृत असल्याने त्यांच्याकडूनही प्राप्त झालेला गायकवाड यांचा तपासणी अहवाल वैद्यकीय आरोग्य विभागाने अखेर ग्राह्य धरला.