महापालिकेने वाढवल्या २३ गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:19+5:302021-07-20T04:12:19+5:30
नाशिक : महापालिकेच्या बससेवेला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असून, नवीन मार्गांवरदेखील प्रवासी वाढू लागले आहेत. त्यामुळे सोमवारी (दि.२३) बस वाढविण्यात ...
नाशिक : महापालिकेच्या बससेवेला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असून, नवीन मार्गांवरदेखील प्रवासी वाढू लागले आहेत. त्यामुळे सोमवारी (दि.२३) बस वाढविण्यात आल्या असून, अनेक नवीन मार्गांवरदेखील त्या सुरू करण्यात आल्या आहे. ८ जुलैस महापालिकेने २७ बस सुरू केल्या होत्या आता त्यात २३ बसची भर घातल्याने एकूण ५० बस सुरू झाल्या आहेत.
महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करताना ५० बस सुरू करण्याची घाेषणा करण्यात आली होती. मात्र, कोराेना काळामुळे नाशिक महानगर परिवहन महामंडळाने आस्ते कदम धोरण स्वीकारले. त्यामुळे पहिल्यांदाच ५० बस सुरू करण्याची घाेषणा केल्यानंतर सुद्धा प्रत्यक्षात २७ बस सुरू करण्यात आल्या. या बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आता तर सरासरी आठ हजार प्रवाशांची वाहतूक करण्यात येत आहे. नाशिकरोड आणि पंचवटी विभागातून नऊ मार्गांवर ही सेवा सुरू असून, त्यातील आता अनेक नवीन मार्गांवर प्रवाशांची मागणी वाढत आहे त्यामुळे आता नवीन मार्गांवरदेखील बस सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे सोमवारपासून एकूण ५० बस रस्त्यावर धावत आहेत. यापूर्वी २७ बस सुुरू करताना त्यातील २० बस सीएनजी होत्या तर सात बस डिझेलच्या होत्या आता मात्र नवीन सर्व बस डिझेलच्या असल्याने एकूण ३० बस डिझेलच्या तर २० सीएनजी बस धावत आहेत.
इन्फो...
या मार्गांवरही सुरू झाल्या बस
- नाशिकरोड ते बारदाण फाटा (अशोकनगरमार्गे)
- तपोवन- अंबड (गरवारेमार्गे
-तपोवन- अंबड (कामटवाडे मार्गे)
- तपोवन- पाथर्डी (वासननगर- पाथर्डी फाटामार्गे)