मनपाच्या आंगणवाड्या आयसीडीएसकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:23 AM2018-07-18T01:23:37+5:302018-07-18T01:23:42+5:30
नाशिक : शहराच्या विविध भागांत महापालिकेच्या वतीने संचलित १३६ आंगणवाड्या पटसंख्येअभावी बंद करण्याच्या प्रशासनाच्या निर्णय गाजत असताना आता उर्वरित सर्वच आंगणवाड्या शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प म्हणजेच आयसीडीएस विभागाकडे वर्ग करण्यात येणार असून, तशी माहिती मंगळवारी (दि. १७) समाजकल्याण विभागाचे उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकीत दिली आहे.
नाशिक : शहराच्या विविध भागांत महापालिकेच्या वतीने संचलित १३६ आंगणवाड्या पटसंख्येअभावी बंद करण्याच्या प्रशासनाच्या निर्णय गाजत असताना आता उर्वरित सर्वच आंगणवाड्या शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प म्हणजेच आयसीडीएस विभागाकडे वर्ग करण्यात येणार असून, तशी माहिती मंगळवारी (दि. १७) समाजकल्याण विभागाचे उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकीत दिली आहे.
शहरी भागातील अंगणवाड्याही आयसीडीएसमार्फतच राबविण्याचे शासनाचे धोरण असून, शासनाने तसा निर्णय घेतल्यानेच प्र्रशासनाने आयसीडीएसकडे मनपाच्या उर्वरित २७६ अंगणवाड्याची माहिती पाठविल्याचे उपायुक्तांनी स्पष्ट केले. दरम्यान, अंगणवाड्या बंद न करण्याचा हेका महिला व बाल कल्याण समितीने कायम ठेवला असून, कमी मुलाची संख्या असलेल्या ठिकाणी पटसंख्या वाढविण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक संधी देण्याची सूचना महिला बालकल्याण समितीच्या वतीने प्रशासनाला करण्यात आली.
महिला व बालकल्याण समितीची बैठक मंगळवारी (दि.१७) सभापती कावेरी घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पटसंख्येअभावी १३६ अंगणवाड्या बंद करण्याच्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाबाबत यावेळी जोरदार चर्चा झाली. प्रशासनाने फेब्रुवारीत केलेले अंगणवाड्यांचे सर्वेक्षण बोगस असल्याचा गंभीर आरोप समितीच्या उपसभापती सीमा ताजणे, हेमलता कांडेकर, आशा तडवी, सीमा निगळ आदी सदस्यांनी केली. जेलरोडवर तर ज्या अंगणवाडीत ३५ मुले आहेत ती बंद करण्यात आली आणि त्याच्या बाजूला २५ मुलगे आहेत, अशी अंगणवाडी सुरूच ठेवण्यात आल्याचे यावेळी ताजणे यांनी सांगितले, तर प्रशासनाने केलेले सर्वेक्षण निर्दोष असून, अंगणवाडी कर्मचाºयांनी दिलेल्या माहितीनुसारच प्रशासनाने निर्णय घेतल्याचे उपायुक्त फडोळ यांनी सांगितले. राज्य शासनाच्या निर्णयानुसार शहरी भागातील अंगणवाड्यादेखील शासनाच्या आयसीडीएसमार्फतच चालविण्याचे धोरण आहे. त्यामुळे सर्वच अंगणवाड्या आयसीडीएस विभागाला वर्ग करण्यात येणार असून, तसे पत्र संबंधित पत्र देण्यात आल्याची माहितीदेखील उपायुक्त फडोळ यांनी दिली.
दरम्यान, महिला सक्षमीकरणासाठी तीन हजार महिला व मुलींना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार असून, या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच महासभेच्या मान्यतेसाठी सादर केले जाणार असल्याचे समाजकल्याण उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांनी सांगितले.
महिलांसाठी मनपात स्वतंत्र विश्रांती कक्ष
महिला व बालकल्याण विभागांतर्गत महिला सदस्य, कर्मचाºयांकरिता स्वतंत्र विश्रांती कक्ष उभारण्याच्या प्रस्तावास समितीने मान्यता दिली. जागतिक महिला दिन ८ मार्चनिमित्त दिव्यांग महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन करणे, प्रभाग २७ मधील अंबड सर्व्हे नं. ३०७ व ३०८ साईग्राम येथे अभ्यासिका बांधण्याच्या प्रस्तावाबाबतही सभेत चर्चा झाली.
तर मनपात भरविणार आंगणवाडी..
आडगाव येथील प्रभाग क्र मांक २ मध्ये महापालिकेच्या शाळा क्रमांक ६९ व ७० एकत्र करण्यात आल्या असून, त्यामुळे सकाळ आणि दुपारसत्रात शाळा भरविल्या जात आहेत.साहजिकच या शाळेत भरणारी येथील आंगणवाडी भरपावसात उघड्यावर भरविण्याची वेळ आली आहे. सुमारे शंभर ते दीडशे पटसंख्या असलेल्या आंगणवाडीला पर्यायी जागा उपलब्ध करून न दिल्यास महापालिकेतच आंगणवाडी भरविण्याचा इशारा शीतल माळोदे यांनी दिला आहे.