चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:15 AM2021-02-10T04:15:15+5:302021-02-10T04:15:15+5:30

नाशिक जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानवारीपासून सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल गन सॅनिटायझर स्टँड. हात धुण्याची ...

No chocolate, I want a sanitizer | चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे

चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे

Next

नाशिक जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानवारीपासून सुरू झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल गन सॅनिटायझर स्टँड. हात धुण्याची सुविधा शिक्षण संस्थांकडून शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, वैयक्तिक सुरक्षा व खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थीही मास्क, सॅनियटाझर आपल्या बॅगेत घेऊनच शाळेत येत आहेत. त्यामुळे वर्गातील विषयनिहाय तासिकांची पुस्तके, वह्यांसोबत छोटीसी सॅनिटायझरची बाटली, मास्क घेतला आहे का? हे तपासून मगच विद्यार्थी शाळेसाठी घराबाहेर पडत आहेत.

--

विद्यार्थी सुरक्षित

विद्यार्थ्यांकडून घेतली जाणारी ही काळजी त्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असून त्यामुळेच शाळा सुरू होऊन तब्बर १५ दिवस उलटत आले असले तरी विद्यार्थी सुरक्षित असून कोणालाही कोरोनाची बाधा झाल्याचे प्रकरण अद्याप समोर आलेले नाही. तसेच शाळांमधील उपस्थितीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत शाळांमधील उपस्थिती ८५ टक्क्यांहून अधिक झाली आहे.

--

विद्यार्थी म्हणतात...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित राहण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर महत्त्वाचे आहे. त्यामुळे शाळेत जाताना आईला सांगून रोज सॅनिटायझर शाळेच्या बॅगेत ठेवून घेतल्यानंतरच शाळेसाठी घराबाहेर पडते.

-पायल शाह, इंदिरानगर

--

आई- वडील घराबाहेर पडताना आवर्जून मास्क आणि सॅनिटायझर वापरतात. त्यामुळे मग शाळेत जातानाही आम्ही सॅनियाझर मागून घेतो. मास्क आईच आठवणीने लावून देते.

-सिद्धेच कदम, सातपूर

---

कोरोनापासून बचावासाठी आम्ही आठवीतील सर्वच मित्र मास्क आणि

सॅनिटायझरचा वापर नियमित करतो. शाळेतही एकमेकांपासून अंतर राखूनच वर्गात बसतो. शाळेत शिक्षकही मास्क आणि सॅनिटायझर वापराचे महत्त्व रोज पटवून देतात. त्यामुळे कोणीही या वस्तू विसरत नाही.

-ओमकार पाटील, गोविंदनगर

--

पॉइंटर-

जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळांची स्थिती

जिल्ह्यातील विद्यार्थी - ४,७७,६३० विद्यार्थ्यांची उपस्थिती - ४ लाख ५ हजार

जिल्ह्यातील शाळा - ५६२६

जिल्ह्यातील शिक्षक -१२,३२४

Web Title: No chocolate, I want a sanitizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.