मालेगाव मनपा आयुक्तांवरील अविश्वास ठराव बहुमताने मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:15 AM2021-03-26T04:15:25+5:302021-03-26T04:15:25+5:30

----------------------- असे झाले मतदान प्रारंभी कॉंग्रेसच्या २८, महागठबंधन आघाडीच्या २६ नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले, तर सेनेचे नगरसेवक नारायण ...

No-confidence motion against Malegaon Municipal Commissioner passed by majority | मालेगाव मनपा आयुक्तांवरील अविश्वास ठराव बहुमताने मंजूर

मालेगाव मनपा आयुक्तांवरील अविश्वास ठराव बहुमताने मंजूर

googlenewsNext

-----------------------

असे झाले मतदान

प्रारंभी कॉंग्रेसच्या २८, महागठबंधन आघाडीच्या २६ नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले, तर सेनेचे नगरसेवक नारायण शिंदे प्रकृती अस्वास्थामुळे सभेला गैरहजर होतेे. सेनेच्या १३ पैकी १२ नगरसेवकांनी, भाजपच्या ९, तर एमआयएमचे युनूस इसा व सादिया लईक हे दोन नगरसेवक प्रकृती अस्वास्थामुळे गैरहजर असल्यामुळे एमआयएमच्या ५ अशा ८० नगरसेवकांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान करून आयुक्त कासार यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव ठराव बहुमताने मंजूर केला आहे. सभागृहात मंजूर झालेला ठराव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. आता आयुक्त कासार यांना कुठलेही कामकाज करू देणार नाही, असे महापौर ताहेरा शेख यांनी सभागृहात जाहीर केले आहे.

-------------------

एमआयएमची मतदानप्रक्रियेत सावध भूमिका

सत्ताधारी कॉंग्रेस, शिवसेना व महागठबंधन आघाडी, भाजप महापालिका आयुक्त दीपक कासार यांच्या कामकाजाबाबत असमाधान व्यक्त करीत आक्रमक झाले होते. आयुक्तांच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवक गेल्याने एमआयएमने मतदानप्रक्रियेवेळी सावध भूमिका घेतली. दोन दिवसांपूर्वी एमआयएम तटस्थ राहण्याच्या तयारीत होती. तसेच आयुक्तांवरील अविश्वास ठराव हे कॉंग्रेसचे ढोंगीपण असल्याची टीका गटनेते डॉ. खालीद परवेझ यांनी केली होती; मात्र मतदान प्रक्रियेवेळी एमआयएमच्या पाच नगरसेवकांनीही मनपा आयुक्त यांच्या विरोधात भूमिका घेत मतदानप्रक्रियेत सहभाग घेतला. जनतेच्या व सर्वपक्षीय नगरसेवकांच्या रोषाला टाळण्याची यशस्वी खेळी एमआयएमकडून खेळण्यात आली.

--------------------

महापालिका आयुक्त दीपक कासार यांच्यावर यापूर्वीदेखील अविश्वास ठराव आणण्याची तयारी होती; मात्र राज्यात व महापालिकेत काँग्रेस-सेनेची सत्ता आहे. कृषिमंत्री दादा भुसे राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करीत आहेत. भुसे यांनी अविश्वास ठराव आणू नये. आयुक्त कासार कामकाजात सुधारणा करतील, असे सांगितले होते; मात्र आयुक्त कासार हे नेहमीच गैरहजर राहत होते. शासनाने ठराव मंजूर करुन तातडीने नवीन आयुक्तांची नेमणूक करावी.

- रशीद शेख, माजी आमदार तथा नगरसेवक

फोटो फाईल नेम : २५ एमएमएआर ०१ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव मनपा आयुक्त दीपक कासार यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाच्या बाजूने विशेष महासभेत हात उंचावून मतदान करताना महापौर ताहेरा शेख, उपमहापौर नीलेश आहेर.

फोटो फाईल नेम : २५ एमएमएआर ०१ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव मनपा आयुक्त दीपक कासार यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाच्या बाजूने विशेष महासभेत हात उंचावून मतदान करताना कॉंग्रेसचे नगरसेवक.

===Photopath===

250321\25nsk_31_25032021_13.jpg~250321\25nsk_32_25032021_13.jpg

===Caption===

फोटो कॅप्शन बातमीसोबत दिले आहे.~फोटो कॅप्शन बातमीसोबत दिले आहे.

Web Title: No-confidence motion against Malegaon Municipal Commissioner passed by majority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.