जिल्ह्यात नाही एकही कोरोना बळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:24 AM2021-02-06T04:24:40+5:302021-02-06T04:24:40+5:30

नाशिक : जिल्ह्यात गुरुवारचा (दि.४ ) दिवस प्रदीर्घ काळाने पुन्हा एकदा कोरोना बळीविरहीत ठरला. त्यामुळे नूतन वर्षासाठीचे हे शुभसंकेत ...

No corona victim in the district! | जिल्ह्यात नाही एकही कोरोना बळी !

जिल्ह्यात नाही एकही कोरोना बळी !

Next

नाशिक : जिल्ह्यात गुरुवारचा (दि.४ ) दिवस प्रदीर्घ काळाने पुन्हा एकदा कोरोना बळीविरहीत ठरला. त्यामुळे नूतन वर्षासाठीचे हे शुभसंकेत मानले जात असून यापुढे कोरोना बळी जाण्याचे प्रमाण नामशेष होवो, हीच भावना सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाली. दरम्यान गुरुवारी एकूण १४३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १४५ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत.

गत महिन्यापासूनच जिल्ह्यातील मृतांचे प्रमाण दोन आकड्यांतून एका आकड्यात आले होते. त्यातही महिन्याच्या उत्तरार्धात मृतांचा आकडा एक ते तीन दरम्यान रहात होता. त्यातही घट येऊन गत आठवड्यापासून एक-दोन असेच मृत्युप्रमाण झाले होते. दरम्यान नाशिक शहरात २ फेब्रुवारीपासूनच एकाही मृत्युची नोंद झालेली नाही. त्यानंतर आता जिल्ह्यातदेखील एकही कोरोनामृत्यु न झाल्याने जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य विभागानेदेखील काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे. वर्षाच्या नवीन महिन्यापासूच कोरोनाची दहशत कमी होऊ लागली असून अशा प्रकारे मृत्युदर शून्यावर कायम राहिल्यास कोरोनाची भीती पूर्णपणे संपुष्टात येऊ शकणार आहे. दरम्यान गुरुवारी नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १६ हजार ३८४ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख १३ हजार १२४ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत तर १२०६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.२० वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.९०, नाशिक ग्रामीण ९६.२७, मालेगाव शहरात ९३.१४, तर जिल्हाबाह्य ९५.०५ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ५ लाख ४ हजार १३९ असून, त्यातील ३ लाख ८७ हजार ३०५ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १६ हजार ३८४ रुग्ण बाधित आढळून आले असून, ४५० रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

इन्फो

उपचारार्थीतही मोठी घट

जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक कमी प्रमाण जिल्हाबाह्य रुग्णांचे असून ती संख्या अवघी ३ वर आली आहे. मालेगाव मनपा क्षेत्रातील उपचारार्थी १४९ असून नाशिक ग्रामीणचे ४६८ आहेत. तर नाशिक मनपा क्षेत्रात ५८६ जणांवर उपचार सुरु असून सध्या १२०६ वर असलेली उपचारार्थींची संख्या महिनाअखेरपर्यंत हजाराच्या खाली येण्याची चिन्हे आहेत.

Web Title: No corona victim in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.