अध्यक्षपदावरून कोणतेही मतभेद नाहीत : छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:26 AM2021-02-06T04:26:08+5:302021-02-06T04:26:08+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.५) झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभा अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या ...
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.५) झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभा अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी भुजबळ यांना विचारले असता त्यांनी अध्यक्षपदावरून कोणतेही मतभेद नसल्याचे सांगितले. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणे हा काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे. याबाबत अंतिम निर्णय तीनही पक्षांचे ज्येष्ठ नेते घेतीलच. मंत्रिमंडळात इतर कोणताही बदल होण्याची शक्यता नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले. इंधन दरवाढीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राज्याने टॅक्स कमी करण्यापेक्षा केंद्राने टॅक्स कमी केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
सुरत - चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार असून महाराष्ट्रात नाशिक, नगर आणि सोलापूर या महामार्गाने जोडले जाणार आहेत. जिल्ह्यातील सहा तालुके आणि ६९ गावांतून सुरत - चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग जाणार आहे. ९९५ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित करावी लागणार आहे. येत्या ३ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.