तिकिटांच्या ‘वाटण्या’ करण्यास मनाई

By admin | Published: August 1, 2016 12:39 AM2016-08-01T00:39:43+5:302016-08-01T00:39:52+5:30

अशोक चव्हाण यांची तंबी : आघाडीचे अधिकार स्थानिक शाखांना; नोव्हेंबरमध्ये सोनियांची सभा

No 'distribution' of tickets | तिकिटांच्या ‘वाटण्या’ करण्यास मनाई

तिकिटांच्या ‘वाटण्या’ करण्यास मनाई

Next

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नेते आपसात तिकिटांच्या वाटण्या करून कोटा ठरवून घेत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या वाटण्या करू नका, अशी तंबी कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी स्थानिक स्तरावर अधिकार देताना शहर कॉँग्रेसने सर्वांना विश्वासात घेऊन तसा प्रस्ताव पाठविल्यानंतर प्रदेश आघाडी निर्णय घेईल, त्यामुळे राष्ट्रवादीस बरोबर घेतल्याने फायदा - तोट्याचा विचार करूनच निर्णय घ्यावा, असा सल्लाही त्यांनी स्थानिक नेतृत्वाला दिला आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्र्यंबकरोडवरील ग्रीन व्ह्यू हॉटेल येथे बैठक संपन्न झाली. यावेळी चव्हाण यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना निवडणुकीची रणनीती ठरविण्यासंबंधी मार्गदर्शन केले.

Web Title: No 'distribution' of tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.