महापारेषणचा शॉक! नाशिक तालुक्यातील सुमारे ६० गावं अंधारात
By संजय पाठक | Published: June 10, 2024 05:50 PM2024-06-10T17:50:18+5:302024-06-10T17:51:30+5:30
नाशिक शहराजवळाच एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आहे. या ठिकाणी असलेल्या १५० व्ही क्षमतेच्या पाॅवर ट्रान्सफर मध्ये ६ जून मध्ये बिघाड झाला होता.
महापारेषणच्या एकलहरे येथील उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफार्मरमध्ये अचानक बिघाड झाल्याने सुमारे पन्नास ते साठ गावं तसेच नाशिकरोड येथील काही भागातील वीज पुरवठा बंद पडला आहे. त्यामुळे नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. अर्थात, दुरूस्तीचे काम सुरू असून या गावांना पर्यायी स्त्रोतांच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा केला जात आहे अर्थात काही तास वीज येते आणि परत जात असल्याने या गावातील नागरीक मात्र त्रस्त झाले आहेत.
नाशिक शहराजवळाच एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आहे. या ठिकाणी असलेल्या १५० व्ही क्षमतेच्या पाॅवर ट्रान्सफर मध्ये ६ जून मध्ये बिघाड झाला होता.
त्यानंतर उर्वरीत दोन ट्रान्सफार्मरमध्ये आज सकाळी बिघाड झाल्याने महापारेषणकडून नाशिकरोड तसेच एकलहरे परीसरातील सुमारे पन्नास ते साठ गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. एकलहरे येथील महापारेषणच्या केंद्रातून पंचक, मुक्तीधाम, देवळाली, भगुर, एकलहरे व सामनगाव येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रांना विद्युत पुरवठा केला जातो. मात्र, बिघाड झाल्याने अडचण निर्माण झाली असून ४८ ते ७२ तास दुरूस्तीसाठी कालावधी लागु शकतो. त्यामुळे या भागात वीज पुरवठा बंद राहाण्याची शक्यता असल्याचे महावितरणने कळवले आहे.