शेतकऱ्यांच्या जमीन लिलावासाठी बँकेला गावात ‘नो एन्ट्री’; गावांनी केला ठराव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 06:14 PM2023-07-13T18:14:16+5:302023-07-13T18:16:36+5:30

जिल्हा बँकेने सक्तीचे कर्ज वसुली सुरू केल्यानंतर अनेक गावांतील ग्रामपंचायतींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्याची भूमिका घेतली असून कर्जवसुलीसाठी बँकांना गावात बंदी करण्याचा ठराव केला आहे.

'no entry' in village for NDCC bank, Villages decided | शेतकऱ्यांच्या जमीन लिलावासाठी बँकेला गावात ‘नो एन्ट्री’; गावांनी केला ठराव

शेतकऱ्यांच्या जमीन लिलावासाठी बँकेला गावात ‘नो एन्ट्री’; गावांनी केला ठराव

googlenewsNext

नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली करण्यासाठी निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात मोहीम उघडली असून शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर निफाडमधील हिंगलाज नगर (खेडे) आणि नांदुर्डी या दोन गावांनी ग्रामसभेत ठराव करून बँकेला शेतकऱ्यांच्या जमीन लिलावासाठी तसेच कर्ज वसुलीसाठी मनाई केली आहे. 

कोरोना काळातले संकट आणि बदलत्या हवामानामुळे अडचणीत येणारी शेती यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून त्याची कर्ज फेडण्याची पत कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. मात्र जिल्हा बँकेने सक्तीचे कर्ज वसुली सुरू केल्यानंतर अनेक गावांतील ग्रामपंचायतींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्याची भूमिका घेतली असून कर्जवसुलीसाठी बँकांना गावात बंदी करण्याचा ठराव केला आहे. या शिवाय शेतकऱ्यांची वीजबिले खंडीत करू नये असेही या ठरावात म्हटले आहे. त्यावर सूचक म्हणून जयराम मेधाणे, तर अनुमोदक म्हणून शिवनाथ कावळे यांच्यासह सरपंचांच्या स्वाक्षऱ्या आहेत. असाच ठराव निफाड तालुक्यातील नांदुर्डी गावच्या आमसभेने केला असून त्यावर सरपंच सौ. जयश्री जाधव यांच्यासह सूचक व अनुमोदकाच्या सह्या आहेत.

शेतकऱ्यांना कर्ज देतेवेळी शासनाने कर्ज करारात हमी घेतलेली होती. मात्र तरीही शेतकऱ्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केला असून बँकांच्या सक्तीच्या वसुली व जप्ती व लिलावाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. सदर कर्ज माफ करण्याची मागणीही यात केली असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाची दखल न घेतल्यास १४ व १५ जुलै रोजी तीव्र नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानात शेतकरी बांधवांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शेतकरी संघटनेच्या वतीने दिला आहे.

दरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक महिला-पुरुष शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदनही प्रशासनाला देण्यात आले.  या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, शेतकरी संघटना समन्वय समिती, राज्य अध्यक्ष भगवान बोराडे यांच्यासह दिलीप पाटील, कैलास बोरसे. दत्तात्रय सुडके, देवा बापु वाघ, अनंत पाटील, नंदुकुमार देवरेल दिपक निकम, बापु साहेब जाधव, सुनिल देव भाऊसाहेब पाटील यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: 'no entry' in village for NDCC bank, Villages decided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.