द्वारकाकडे जाणाºया समांतर रस्त्यांवर ‘नो-एन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 11:34 PM2020-01-30T23:34:51+5:302020-01-31T00:45:19+5:30
द्वारका चौकात शहरातील मुख्य चार व अन्य सात उपरस्ते एकत्र येतात. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटता सुटत नसल्याने वाहतूक पोलीस प्रशासनाच्या नाकीनव आले आहे. यामुळे पोलिसांनी द्वारकेच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. समांतर रस्त्यांवरून द्वारकेकडे वाहने जाणार नाही, अशी अधिसूचना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गुरुवारी (दि. ३0) जारी केली.
नाशिक : द्वारका चौकात शहरातील मुख्य चार व अन्य सात उपरस्ते एकत्र येतात. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटता सुटत नसल्याने वाहतूक पोलीस प्रशासनाच्या नाकीनव आले आहे. यामुळे पोलिसांनी द्वारकेच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. समांतर रस्त्यांवरून द्वारकेकडे वाहने जाणार नाही, अशी अधिसूचना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गुरुवारी (दि. ३0) जारी केली.
द्वारकेची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. द्वारका मोकळा श्वास कसा घेईल, यादृष्टीने सर्वोपरी प्रयत्न के ले जात आहे. शहर वाहतूक पोलिसांनी विविध उपाययोजना उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यास सुरुवात केली आहे. यानुसार २८ जून २०१६ साली काढली गेलेली अधिसूचना पुन्हा नव्याने काढण्यात येत असल्याचे चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या अधिसूचनेनुसार वडाळा नाका, टाकाळीफाटा, ट्रॅक्टर हाउस, झाकीर हुसेन रुग्णालयामार्गे समांतर रस्त्यांचा होणारा दुहेरी वापर थांबविण्यात येणार आहे. या मार्गांवरून कोणतेही वाहन द्वारकेवर येणार नाही, तर महामार्गाचा वापर करून द्वारकेवर येतील, असे चौगुले म्हणाल्या.
सारडा सर्कलवरून ‘यू-टर्न’
द्वारकेवरून बागवानपुºयात जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय शहर वाहतूक शाखेने घेतला आहे. बागवानपुरामार्गे जुन्या नाशकात जाणारी सर्व वाहतूक सारडा सर्कलमार्गे यू-टर्न घेत फाळके रोडमार्गे पुढे जातील. बागवानपुरा मार्गे केवळ द्वारकेवर येण्यासाठी परवानगी राहणार आहे. वरील निर्बंध मात्र शववाहिका, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस वाहने यांना लागू राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही अधिसूचना जाहीर झाल्यानंतर त्याचा भंग करणाºया वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे चौगुले यांनी स्पष्ट केले.