मतमोजणी केंद्रांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ‘नो एण्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 01:18 AM2019-10-20T01:18:43+5:302019-10-20T01:19:19+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी शहरात सोमवारी (दि.२१) मतदान व गुरु वारी (दि.२४) मतमोजणी होणार आहे. यामुळे शहर वाहतूक शाखेने वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत. वाहनचालकांना मतमोजणी परिसरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी म्हटले आहे.
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी शहरात सोमवारी (दि.२१) मतदान व
गुरु वारी (दि.२४) मतमोजणी होणार आहे. यामुळे शहर वाहतूक शाखेने वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत. वाहनचालकांना मतमोजणी परिसरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी म्हटले आहे.
निवडणूक काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी शहर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. शहरात चार विधानसभा मतदारसंघ असून, ५ मतमोजणी ठिकाणे आहेत. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता मतमोजणी परिसरात ‘नो व्हेईकल झोन’ जाहीर करण्यात आला आहे. रविवारी (दि.२०) मतदानासाठी मतपेटी वाटप, सोमवारी मतपेटी जमा करून गुरुवारी मतमोजणी होणार आहे. वाहतूक बंदचे निर्बंध पोलीस वाहने, निवडणूक मतदान प्रक्रियेतील अधिकृत वाहने, रु ग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाच्या बंब यांना लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवेशबंदीचे वेळापत्रक
च्रविवारी (दि.२०) सकाळी ८ ते दुपारी ३ वा.
च्सोमवारी (दि.२१) सायंकाळी ६ ते रात्री १२ वा.
च्गुरु वारी (दि.२४) सकाळी ६ ते रात्री १२ वा.
अशी आहेत मतमोजणीची ठिकाणे
च्पूर्व : विभागीय क्र ीडा संकुल (मीनाताई ठाकरे स्टेडियम) नवीन आडगाव नाका
क्र ीडा संकुलसमोरील महामार्गाचा समांतर रस्ता हिरावाडी टी-पॉइंट ते क. का. वाघ चौफुलीपर्यंत, हिरावाडी टी पॉइंट ते कालव्यापर्यंत (सनराईज बिल्डिंग) मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
च्पर्यायी मार्ग : हिरावाडीकडून क्र ीडा संकुलमार्गे समांतर रस्त्यावरून येणारी वाहतूक हिरावाडी- काट्या मारु ती चौकातून व हिरावाडी-स्वामिनारायण चौकाकडून पुढे रवाना होईल.
च्पश्चिम : संभाजी स्टेडियम, सिडको. सिडको रुग्णालय ते अंबड लिंकरोड, पेट्रोलपंप ते मायको हॉल व आयडीयल कॉर्नर (लॉरेंस स्कूल) ते पुढचा हॉटेल एक्सलेन्सी मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद क रण्यात येणार आहे.
च्पर्यायी मार्ग : डीजीपीनगररोड, अंबड गाव, माउली लॉन्स या मार्गांचा वाहनचालकांनी अवलंब करावा. पाथर्डीफाटा, राणेनगर, लेखानगर या मार्गांचा अवलंबदेखील करता येणार आहे.
च्देवळाली : महापालिका विभागीय कार्यालय,नाशिकरोड. मुक्तिधाम चौक ते सत्कार पॉइंटपर्यंत दोन्ही बाजूने वाहतुकीकरिता बंद राहणार आहे.
च्पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी बिटको चौकाकडून सत्कार पॉइंटकडे ये-जा करणारी वाहतूक शिवाजी पुतळा, नाशिकरोड रेल्वेस्थानक, रिपोर्ट कॉर्नर ते सत्कार पॉइंटकडून देवळाली कॅम्प, भगूरकडे मार्गस्थ होईल.