जनावरांच्या दावणीला नाही चारा ... दुष्काळाची घोषणा कागदावर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 05:16 PM2019-02-24T17:16:31+5:302019-02-24T17:17:35+5:30
मानोरी : यंदाचा दुष्काळ गंभीर स्वरूपाचा जाणवत असून जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर होत चालला असताना वन्य प्राण्याबरोबर वाळवंटातील उंट देखील मानोरी बुद्रुक परिसरात चाऱ्याच्या शोधात आलेले असल्याचे आढळून आले आहे. तब्बल ६ उंटांचा कळप रविवारी (दि.२४) राजस्थान मधून मानोरीत चाºयाच्या शोधात आलेले असल्याने उंट बघण्यासाठी मोठी गर्दी नागरिकांनी केली होती.
मानोरी : यंदाचा दुष्काळ गंभीर स्वरूपाचा जाणवत असून जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर होत चालला असताना वन्य प्राण्याबरोबर वाळवंटातील उंट देखील मानोरी बुद्रुक परिसरात चाऱ्याच्या शोधात आलेले असल्याचे आढळून आले आहे. तब्बल ६ उंटांचा कळप रविवारी (दि.२४) राजस्थान मधून मानोरीत चाºयाच्या शोधात आलेले असल्याने उंट बघण्यासाठी मोठी गर्दी नागरिकांनी केली होती.
त्याच बरोबर वानर सुद्धा अन्न पाण्याच्या शोधात मानोरीत मानवी वस्तीकडे भरकटले असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी संध्याकाळी एक वानर थेट मानवी वस्तीत घुसले होते. विशेष बाब म्हणजे हे वानर आपली तहान भागविण्यासाठी व्याकूळ झालेले होते. वानराने आपली तहान भागविण्यासाठी थेट माणसांच्या घोळक्यात उभे राहिल्याचे दिसून आले.
यंदा पावसाने दडी मारल्याने येवला तालुक्यात सर्वत्र वेळेच्या आधीच दुष्काळाच्या झळा जाणवण्यास सुरु वात झाली आहे. शासनाने दुष्काळाची घोषणा केवळ कागदावरच केलेली असून तीन महिने उलटून गेलेले असून प्रत्यक्षता अमलबजावणी होत नसल्याने शेतकºयांकडून नाराजी व्यक्त केली जात असून केवळ घोषणा नको तर प्रत्यक्षात अमलबजावणी करण्याची मागणी शेतकºयाकडून होत आहे.
येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड फाटा, शिरसगाव लौकी, पिंपळगाव लेप, नेउरगाव आदि परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात मक्याचे पिक घेण्यास सुरु वात केली होती. परंतु पावसाने हुलकावणी दिल्याणे मक्याचे उत्पादन घटून चारा देखील उपलब्ध न झाल्याने मागील दोन महिन्यापासून शेतकरी आपल्या जनावरांना महागडा चारा विकत आणून जणावरे सांभाळत आहे.
मुखेड परिसरात मोठया प्रमाणात उसाचे क्षेत्र असून उस तोड सुद्धा सुरु असून मुखेड आणि सत्यगाव परिसरात मागील महिनाभरापासून देशमाने, मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, सत्यगाव, भिंगारे, नेउरगाव, जळगाव नेउर, वाकद, मानोरी खुर्द येथून मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या जनावरासाठी दररोज संध्याकाळी ऊसाच्या बांड्या खरेदी करण्यासाठी येत असतात.
नांदगाव तालुका तसेच मनमाड भागातील मेंढपाळ येवला तालुक्यात दाखल झालेले आहे. यात एका कळपात सुमारे दोनशे ते तीनशे मेंढ्या असून असे १०० हून अधिक कळप येवला तालुक्यात दाखल झालेले आहे.
शेतकºयांच्या जनावरांबरोबर वन्य प्राण्यांची देखील अन्न पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असताना दिसून येत आहे. मानोरी बुद्रुक आणि मुखेड परिसरात हरणांची संख्या मोठ्या दिसून येत आहे. शेतकºयांनी थोडाफार आपल्या जनावरांना केलेला हिरवा घास हरणांकडून रात्रीच्या वेळी फस्त करण्यात येत आहे. तसेच रब्बी हंगामातील पिकांची देखील मोठ्या प्रमाणात नासाडी हरणांकडून करण्यात येत आहे.
ग्रामीण भागात ठिकठिकाणी असलेले सार्वजनिक जनावरांचे पाणवठे कोरडे पडत असल्याने वानर, मोर तसेच विविध प्रकारच्या दुर्मिळ जातीचे पक्षी देखील पाणी पिण्यासाठी मानवीवस्तीकडे आगेचूक करत आहे. त्यांमुळे वनविभागाने दुष्काळी भागात वन्यप्राण्यांसाठी चारा छावण्या आणि पाणवठे सुरु करण्याची मागणी होवू लागली आहे.