दोन वर्षांपासून आरोग्य केंद्रांची नाही तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:15 AM2021-01-20T04:15:23+5:302021-01-20T04:15:23+5:30
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुमारे ११० प्राथमिक आरोग्य केंद्रांत अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत आरोग्य केंद्रांमध्ये ...
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुमारे ११० प्राथमिक आरोग्य केंद्रांत अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत आरोग्य केंद्रांमध्ये आगीसारखी घटना घडलेली नसली तरी, भंडारा येथील दुर्घटना लक्षात घेऊन अशा यंत्रांची नियमित देखभाल दुरुस्ती केली जावी, असे आदेश देण्यात आले आहेत. आगीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी सर्वच शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये बसविण्यात आलेल्या अग्निशमन यंत्रांची तपासणी झाली किंवा नाही याची माहिती शासनाने मागविली आहे. आरोग्य केंद्रांच्या यंत्राची तपासणी करण्याबरोबरच रुग्णालयांच्या बांधकामाच्या संरचना याचीही तपासणी करून त्यांच्याकडून ना-हरकत दाखला घेण्याचे तसेच वीज उपकरणांच्या शॉर्टसर्किटमुळेही आगीच्या दुर्घटना घडू शकतात, हे लक्षात घेऊन वीज उपकरणांच्या सुरक्षिततेचे लेखापरीक्षण करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी दिल्या आहेत.
चौकट===
जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये अग्निरोधक यंत्र बसविण्यात आले आहे. त्यातील बहुतांशी यंत्रे सुस्थितीत आहेत. खासगी कंपनीला त्याच्या देखभालीची जबाबदारी सोपविण्यात आली असून, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी येत्या एक महिन्यात यंत्रांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी
-------
बागलाण - ११, चांदवड - ५, देवळा - ५, दिंडोरी - १०, इगतपुरी - ८, कळवण - ९, मालेगाव - ९, नांदगाव - ५, नाशिक - ५, येवला - ६, त्र्यंबक - ७, पेठ - ७, सिन्नर - ७, सुरगाणा - ८, निफाड - १०