कोविड केअर सेंटरमध्ये ना जेवणाची वेळ ना नाष्ट्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:14 AM2021-05-19T04:14:49+5:302021-05-19T04:14:49+5:30

मालेगावी सहारा हॉस्पिटल आणि मसगा महाविद्यालयाचा भोजनाचा ठेका ज्याला देण्यात आला आहे, त्यांच्याकडून दोन्ही ठिकाणी सकाळी ९ वाजता पोहे, ...

No lunch or breakfast at Covid Care Center | कोविड केअर सेंटरमध्ये ना जेवणाची वेळ ना नाष्ट्याची वेळ

कोविड केअर सेंटरमध्ये ना जेवणाची वेळ ना नाष्ट्याची वेळ

Next

मालेगावी सहारा हॉस्पिटल आणि मसगा महाविद्यालयाचा भोजनाचा ठेका ज्याला देण्यात आला आहे, त्यांच्याकडून दोन्ही ठिकाणी सकाळी ९ वाजता पोहे, अंडी आणि चहा दिला जातो. कधी आलू वडा, उपमा आणि पराठा सकाळी नाश्त्यात दिला जातो. दुपारी साडेबारा ते एक वाजेदरम्यान जेवण दिले जाते. यात भाजी, वरण भात, तीन पोळ्या दिल्या जातात. संध्याकाळी साडेपाच वाजता चहा आणि नाश्त्यात उपमा आणि पोहे दिले जातात. रात्री भाजी, तीन पोळ्या आणि खिचडी दिली जाते.

झोडगे ग्रामीण रुग्णालय:

तालुक्यातील झोडगे येथील ग्रामीण रुग्णांलयात ८ बाधित उपचार घेत असून येथे सकाळी साडेआठ ते नऊ वाजेदरम्यान चहा, उपमा, रवा, पोहे दिले जातात. दुपारी ११ ते १२ वाजेदरम्यान वरण, भात, भाजी, तीन पोळ्या दिल्या जातात, तर दुपारी ४ वाजता दूध दिले जाते. एक दिवसाआड अंडी दिली जातात. रात्री ७ ते ८ वाजेदरम्यान वरण भात, भाजी, पोळी दिली जाते. दुपारी १२ ते साडेबारा वाजेदरम्यान जेवणात भाजी पोळी वरण, भात, डाळ. तर दुपारी ४ वाजता चहा दिला जातो. रात्री साडेआठ वाजता जेवणात भाजी पोळी, वरण, भात आणि कधीकधी खिचडी दिली जाते.

दाभाडी कोविड सेंटरला २५ बाधित उपचार घेत आहेत. त्यांना सकाळी सकाळी ८ ते ९ वाजेदरम्यान चहा, नाश्ता, उपमा, पोहे, अंडी आणि बिस्किटे दिली जातात.

इन्फो...

यात सामाजिक संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या राम-रहीम कोविड सेंटरमध्ये रुग्णांना त्यांचे नातेवाईक भोजनाचा डबा घरून आणून देतात. त्यामुळे त्यांना घरचे जेवण मिळत असल्याने रुग्णांची तक्रार नाही. उलट सकाळी साडेआठ वाजता कोरा चहा आणि दोन अंडी देण्यात येतात. रात्री हळदीचे दूध देण्यात येते.

सामान्य रुग्णालय, मालेगाव

येथे कोविड सेंटरमध्ये सकाळी ८ वाजता गुळाचा आयुर्वेदिक काढा आणि हळदीचे दूध, नाश्त्याला पोहे इडली सांबर, रगडा, दोन अंडी रोज दिले जातात. दुपारी भोजनात वरण, भात, भाजी, रविवारी चिकन मसाला दिला जातो. दुपारी ४ वाजता हळदीचे दूध, काढा आणि सायंकाळी ७ वाजता भोजनात भाजी पोळी, मूग डाळ आणि खिचडी दिली जाते.

: येथील सामान्य रुग्णालयात ९६ बाधित उपचार घेत असून त्यांना रोज पौष्टिक आहार दिला जातो बाधितांना रोज प्रथिनेयुक्त आहार दिला जावा. येथे बाधितांना हळदीचे दूध, काढा आणि अंडी दिली जातात. त्यांना पौष्टिक आहार देण्याचा प्रयत्न करतो.

- डॉ. हितेश महाले, जिल्हा शल्यचिकित्सक, मालेगाव

- आम्हाला रोज सकाळी वेळेवर अंडी, चहा आसनी काढा मिळतो. वरण, भात आणि रविवारी चिकन भेटते. आम्ही समाधानी आहोत. घरी जसे जेवण घेतो त्याच प्रकारचे जेवण मिळत आहे.

- येथे आम्हाला सकस आणि पोषक आहार मिळतो. आमची काही एक तक्रार नाही. कधी कधी काही जणांना घरूनदेखील डबा येतो. काढा आणि हळदीचे दूध, अंडी रोजच मिळतात. डॉक्टर्स लक्ष ठेवून असतात. त्यामुळे ठेकेदाराकडून चांगल्या प्रतीचे भोजन मिळत आहे.

===Photopath===

180521\18nsk_21_18052021_13.jpg~180521\18nsk_22_18052021_13.jpg

===Caption===

कोविड सेंटर~भोजनाची थाळी

Web Title: No lunch or breakfast at Covid Care Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.