दूधटंचाई नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:48 AM2018-07-19T00:48:32+5:302018-07-19T00:49:24+5:30
कोल्हापूर/नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीन दिवसांपासून दूध बंद आंदोलन सुरू असले तरी बुधवारी मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये विशेष टंचाई जाणवली नाही. पुरवठ्यावर परिणाम झालेला नाही. दुसरीकडे सरकारने नाशिकमार्गे गुजरात व मुंबईला मोठ्या प्रमाणावर टँकर रवाना केले आहेत.

दुधाच्या प्रश्नावर तोडगा निघत नसल्याने सरकारची नाकेबंदी करण्यासाठी गुरुवारपासून आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. शेतकरी जनावरांसह रस्त्यावर उतरणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात दूध संकलन खूप कमी झाले असले तरी पोलीस बंदोबस्तात खासगी दूध संस्थांचे टँकर शहरांकडे रवाना होत आहेत. बुधवारी अनेक ठिकाणी आंदोलकांनी जाळपोळ करत दूध रस्त्यावर ओतले.
गुरुवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. त्यात तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. साखरेप्रमाणे निश्चित दर हाच दुधावर तोडगा असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.