...आता टोलनाक्यांवर ‘कॅश’ लागणार नाही; ‘फास्टॅग’ दिसताच मार्ग खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 07:01 PM2019-11-14T19:01:21+5:302019-11-14T19:02:58+5:30

एनएचएआय नाशिकद्वारे घोटी, पिंपळगाव बसवंत, चांदवड, धुळे अशा एकूण ५ टोलनाक्यांवर याबाबतची भित्तीपत्रके, जनजागृतीपर फलक लावण्यात येत आहेत.

... no more 'cash' on the tollplaza; Open the way you see 'Fastag' | ...आता टोलनाक्यांवर ‘कॅश’ लागणार नाही; ‘फास्टॅग’ दिसताच मार्ग खुला

...आता टोलनाक्यांवर ‘कॅश’ लागणार नाही; ‘फास्टॅग’ दिसताच मार्ग खुला

Next
ठळक मुद्देगुगल प्ले-स्टोअरवर ‘माय फास्टटॅग’वाहनांच्या लांबच लांब रांगा यापुढे दिसणार नाही

नाशिक : येत्या १ डिसेंबरपासून शहरासह जिल्ह्यात नव्हे तर राज्यभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) वाहनधारकांकडून रोख स्वरूपात टोल शुल्काची रक्कम आकारणार नाही, तर थेट आॅनलाइन पध्दतीने ‘फास्टस्टॅग’ अ‍ॅप्लिकेशनद्वारे रक्कमचा भरणार करून वाहनचालकांना टोलनाक्यांवर न थांबता तत्काळ स्वतंत्र लेनमधून मार्गस्थ होता येईल. यासाठी मोटारीच्या आतील बाजूने चालकाच्या जवळ एक विशिष्ट प्रकारचे ‘फास्टस्टॅग स्टिकर’ लावणे बंधनकारक राहणार आहे.
देशाचे इंधन आणि नागरिकांचा वेळ वाचविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टोल संकलन (ईटीसी) २०१६साली सुरू केले गेले होते. अलिकडेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानेदेखील ईटीसी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली असून एनएचएआय नाशिकद्वारे घोटी, पिंपळगाव बसवंत, चांदवड, धुळे अशा एकूण ५ टोलनाक्यांवर याबाबतची भित्तीपत्रके, जनजागृतीपर फलक लावण्यात येत आहेत. तसेच वाहनचालकांना माहितीपत्रकांचेही वाटप करण्यात येत असल्याची माहिती व्यवस्थापक दिलीप पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, घोटी टोलनाक्यावर सुमारे १० हजार, पिंपळगाव टोल नाक्यावर ३५ हजार फास्टस्टॅग उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अत्याधुनिक आॅनलाइन टोल पेमेंटमुळे टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा यापुढे दिसणार नाही, असा आशावाद प्राधिकरणाने व्यक्त केला आहे.
---
गुगल प्ले-स्टोअरवर ‘माय फास्टटॅग’
फास्टॅग स्टिकर कोणत्याही टोलनाक्यावर, पेट्रोल पंप, बॅँक क ाउंटरकडून सहज उपलब्ध होऊ शकेल, असा दावा एनएचएआयकडून करण्यात आला आहे. फास्टॅग खरेदी केलेल्या वाहनचालकाच्या बॅँक खात्यातून किंवा आॅनलाइन पेमेंट खात्याच्या वॉलेटसोबत फास्टटॅग जोडलेला असेल, त्यामुळे ते स्टिकर चिकटविलेले वाहन जेव्हा टोलनाक्यावरील विशिष्ट लेनमध्ये येईल तेव्हा स्वयंचलित यंत्रणेमार्फत वाहनापुढील बार खुला होईल आणि वाहन सहजरित्या पुढील प्रवासाकरीता मार्गस्थ होईल, असा दावा पाटील यांनी बोलताना केला. गुगलवर ‘माय फास्टटॅग’ नावाचे अ‍ॅपदेखील उपलब्ध आहेत.

Web Title: ... no more 'cash' on the tollplaza; Open the way you see 'Fastag'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.