कोई कसर नहीं छोडेंगे!

By admin | Published: September 20, 2015 11:17 PM2015-09-20T23:17:44+5:302015-09-20T23:18:25+5:30

शिवराजसिंह चौहान : महंतांना दिले कुंभमेळ्याचे निमंत्रण; सुव्यवस्थेची ग्वाही

No one will leave! | कोई कसर नहीं छोडेंगे!

कोई कसर नहीं छोडेंगे!

Next

नाशिक : कुंभ के आयोजन में कोई कसर नहीं छोडेंगे... नाशिकप्रमाणेच उज्जैनचाही कुंभमेळा निर्विघ्न पार पाडू, इथल्याप्रमाणेच आदर्श व्यवस्था ठेवू, अशी ग्वाही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंंह चौहान यांनी दिली.
येत्या एप्रिलमध्ये उज्जैन येथे सिंहस्थ कुंभमेळा होत असून, या पर्वाचे तिन्ही आखाड्यांच्या प्रमुख महंतांना निमंत्रण देण्यासाठी चौहान हे पत्नी साधनासिंह यांच्यासह नाशिकच्या साधुग्राममध्ये आले होते, तेव्हा त्यांनी उपस्थिताना वरील शब्दांत आश्वस्त केले. चौहान यांनी प्रथम निर्वाणी अनी आखाड्यात जाऊन अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत ग्यानदास, श्री महंत धरमदास, श्री महंत गौरीशंकरदास, निर्मोही आखाड्याचे श्री महंत राजेंद्रदास आदिंची, तर नंतर दिगंबर आखाड्यात जाऊन श्री महंत कृष्णदास, श्री महंत रामकिशोरदास शास्त्री, श्री महंत वैष्णवदास यांची भेट घेतली. या सर्वांचे औक्षण करीत त्यांना कुंभमेळ्याचे रीतसर निमंत्रण दिले. महंतांच्या वतीनेही चौहान यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री महंत ग्यानदास म्हणाले, प्रचंड गर्दी होऊनही आणि अखेरच्या पर्वणीला अठरा तास पाऊस पडूनही नाशिकच्या अधिकाऱ्यांनी सेवक होऊन चोख व्यवस्था ठेवली. पर्वण्या यशस्वी झाल्यानेच ईश्वरालाही आनंद झाला आणि पावसाला प्रारंभ झाला. त्यामुळे महाराष्ट्रातला दुष्काळ हटणार आहे. नाशिकच्या धर्तीवर उज्जैनमध्येही साधू-संतांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यावर चौहान यांनी संत-महंतांचा आशीर्वाद लाभल्याने आजचा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगत कुंभाच्या आयोजनाबाबत आश्वस्त केले. दिगंबर आखाड्यानेही नाशिकच्या प्रशासनाने अपेक्षेपेक्षा अधिक सुविधा दिल्याचे सांगत उज्जैनमध्ये असाच अनुभव यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
चौहान यांच्याबरोबर उज्जैन मेळा प्राधिकरण अध्यक्ष दिवाकर नातू, जिल्हाधिकारी कवींद्र कियावत, मेळा अधिकारी अविनाश लवानिया होते. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, नाशिकचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: No one will leave!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.