नाशिकमध्ये खासगी रूग्णालयांना परवानगी,मात्र लसच उपलब्ध नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 03:19 PM2021-05-22T15:19:49+5:302021-05-22T15:52:15+5:30
नाशिक- महापालिकेने शहरातील २१ खासगी रूग्णालयांना त्यांच्या मागणी नुसार लसीकरणासाठी परवानगी दिली खरी मात्र, बाजारात लसच उपलब्ध नसल्याने त्याचा गेांधळ असून लस केाव्हा मिळणार असा प्रश्न आहे.
नाशिक- महापालिकेने शहरातील २१ खासगी रूग्णालयांना त्यांच्या मागणी नुसार लसीकरणासाठी परवानगी दिली खरी मात्र, बाजारात लसच उपलब्ध नसल्याने त्याचा गेांधळ असून लस केाव्हा मिळणार असा प्रश्न आहे.
शासनाकडून सुरूवातील शासकीय, निमशासकीय आणखी खासगी रूग्णालयात लस उपलब्ध करून दिल्या आहेत. महापालिका आणि अन्य शासकीय रूग्णालयात मोफत डोस दिले जात असले तरी खासगी रूग्णालयात अडीचशे रूपयांना एक डोस या दराने डोस दिले जात होते. मात्र नंतर शासनाने खासगी रूग्णालयातील लसीकरण पूर्णत: बंद केले असून केवळ शासकीय रूग्णालय आणि महापालिकेच्या रूग्णालयातील लस दिली जात आहे. अशा स्थितीत महापालिकेकडे खासगी रूग्णालयांनी लसीकरणाची परवानगी मागितली त्यानुसार नाशिक महापालिकेने नाशिक पूर्व विभागात रेडीयन्ट प्लस हॉस्पीटल, साई सिध्दी हॉस्पीटल आणि सुविचार हॉस्पीटल अशा तीन ठिकाणी तर सिडकोत मयुर हॉस्पीटल, सायखेडकर हॉस्पीटल आणि सुश्रूषा क्लीनीक याठिकाणी लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. पश्चीम विभागात प्रसन्न बाल रूग्णालय, मॅग्नम हॉस्पीटल, गंगा ऋषीकेश हॉस्पीटल, साफल्य रेनबेा हॉस्पीटल, नव संजीवनी हॉस्पीटल, निम्स हॉस्पीटल, मानवता कॅन्सर हॉस्पीटल,चिरंजीव हॉस्पीटल, कृष्णा मॅटर्निटी हेाम, बिर्ला आय हॉस्पीटल, अरीहंत हॉस्पीटल, अंतरा हॉस्पीटल, तुळशी हॉस्पीटल तसेच सप्तशृंगी नेत्र सेवा या रूग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. मात्र, अशा प्रकारची परवानगी देताना लस उपलब्धतेबाबत महापालिका जबाबदार राहाणार नाही असे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी नमूद केले आहे.
मुळात महापालिकेला लस उपलब्ध होत नाही राज्य शासनाची देखील तीच अडचण आहे. अशावेळी खासगी क्षेत्राला लस कशी मिळणार असा प्रश्न आहे. महापालिकेने परवानगी दिली असली तरी प्रत्यक्षात लस कधी उपलब्ध होईल, त्याचे दर किती असतील याची केाणतीही माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही.