ना फिजिकल डिस्टन्स ना मास्क,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:25 AM2021-02-06T04:25:29+5:302021-02-06T04:25:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : सातवी, आठवीच्या पुढील बहुतांश विद्यार्थी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असले, तरी ...

No physical distance, no mask, | ना फिजिकल डिस्टन्स ना मास्क,

ना फिजिकल डिस्टन्स ना मास्क,

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : सातवी, आठवीच्या पुढील बहुतांश विद्यार्थी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असले, तरी पाचवी व सहावीचे विद्यार्थी अनेकदा मास्क विसरणे आणि एक दुसऱ्याजवळ जाण्याचा प्रयत्न करण्यासारखा प्रयत्न करीत असल्याने अशा विद्यार्थ्यांना नियंत्रित करून अध्ययन करण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी लागते आहे.

मास्क न वापरणारे आणि फिजिकल डिस्टन्सच्या नियमांंकडे दुर्लक्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना वारंवार या बाबींची आठवण करून देण्यासाठी शिक्षकांना विशेष प्रयत्न करावे लागत आहेत. नाशिक जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्यानंतर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळाही सुरू झाल्या आहेत. आता शिक्षण विभाग पहिली ते चौथीचे वर्गही सुरू करण्याचे नियोजन करीत आहे. परंतु, यापूर्वीच पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केल्यानंतर पाचवी आणि सहावीचे विद्यार्थी मास्क व फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पुरेपूर पालन करीत नसल्याने शिक्षकांना त्यांना वारंवार या गोष्टींची जाणीव करून द्यावी लागते आहे.

पॉइंटर

एकूण शाळा - ५६२६

विद्यार्थी उपस्थिती १,९५,०००

शिक्षक उपस्थिती -२२,५२७

सध्या केवळ तीन तास शाळा आहे. या काळात विद्यार्थी स्वतंत्र बसतात. एकत्र येत नाहीत. एकदा सांगितलेल्या नियमांचे मुलेही तंतोतंत पालन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरक्षित वातावरणात सुरू आहे.

- संजय पवार, शिक्षक

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पालकही विद्यार्थ्यांना घरूनच सर्व नियम समजावून शाळेत पाठवत असल्याने विद्यार्थ्यांना नियंत्रित करताना अडचणी येत नाही.

- नीलकंठ नेर, प्राचार्य, उन्नती विद्यालय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी प्रतिबंधात्मक नियमांचे पालक करतात. मात्र, त्यासाठी त्यांना वारंवार याविषयी जाणीव करून द्यावी लागते. त्याचप्रमाणे दिवसाआड वर्ग सुरू असल्याने एकाच विषयाची पुनरावृत्ती करताना शिक्षकांना कसरत करावी लागते आहे.

-सोपान गंभीरे, शिक्षक

Web Title: No physical distance, no mask,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.