राजकीय पक्ष नव्हे उमेदवार प्रभावी

By admin | Published: February 11, 2017 12:12 AM2017-02-11T00:12:52+5:302017-02-11T00:13:04+5:30

आघाडी, मनसे यांच्यासमोर सेना-भाजपाचे आव्हान

No political party nor effective candidate | राजकीय पक्ष नव्हे उमेदवार प्रभावी

राजकीय पक्ष नव्हे उमेदवार प्रभावी

Next

संदीप झिरवाळ  पंचवटी
सर्वाधिक मतदार आणि विस्ताराने मोठ्या असलेल्या प्रभागात नेहमीच राजकीय पक्षांपेक्षा व्यक्तीकेंद्रित राजकारणाला महत्त्व दिल्याने या भागातून व्यक्ती प्राबल्याचा करिश्मा महत्त्वाचा ठरणार आहे. विस्ताराने सर्वांत मोठा व सर्वाधिक मळे परिसर असलेल्या आडगावच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये सुरुवातीला शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस व त्यानंतर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मनसेला स्वीकारण्यात आले होेते. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाच्या विचारधारेचे मतदार या प्रभागात नसल्याने रिंगणातील सर्वच उमेदवारांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे यंदा निवडणुकीत आडगावकर कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला जवळ करतात त्यावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस या मित्रपक्षात आघाडी झालेली असली तरी या प्रभागात एका गटात कॉँग्रेसने उमेदवार दिला नाही, तर दुसऱ्या गटात राष्ट्रवादीने उमेदवार दिलेला नाही. मात्र महिलांच्या सर्वसाधारण गटात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस या दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर ठाकणार आहेत. शिवसेना, भाजपा व मनसेने चारही गटात उमेदवार उभे केलेले आहेत. अनुसूचित जाती अ गटातून पूनम सोनवणे (भाजपा), मथुरा गांगुर्डे (शिवसेना), सुनीता खरे (मनसे), तर सोनाली जगताप (राष्ट्रवादी कॉँग्रेस) असे प्रमुख पक्षांचे उमेदवार आहेत. यात भाजपा उमेदवार वगळला तर अन्य उमेदवार त्याच प्रभागातील रहिवासी असल्याने मत विभागणी होऊ शकते.
ब गटाच्या अनुसूचित जमाती जागेसाठी माजी नगरसेवक सुरेश खेताडे (भाजपा), सिद्धेश्वर अंडे (शिवसेना), विशाल कोळी (मनसे), ऋषिकेश फुलकर (कॉँग्रेस) पक्षाकडून उमेदवारी करीत आहेत. या गटात खेताडे सोडले तर अन्य सर्वच उमेदवार नवखे आहेत. खेताडे यांनी यापूर्वी याच प्रभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केल्याने व मातब्बरांच्या पॅनलमध्ये त्यांची वर्णी लागल्याने त्यांचे पारडे जड आहे. आडगावात सेना, भाजपाला खाते उघडता आलेले नाही. शिवसेनेचे प्राबल्य या प्रभागात असल्याचे दिसून येते.
सर्वांत लक्षवेधी ठरणाऱ्या क गटाच्या नागरिकांच्या मागासवर्ग गटातून विद्यमान नगरसेवकविरुद्ध माजी नगरसेवक अशी काहीशी लढत होईल. यात मनसेकडून माजी नगरसेवक अनंत सूर्यवंशी, अ‍ॅड. जयराम शिंदे (शिवसेना), उद्धव निमसे (भाजपा) या तीन प्रमुख पक्षांत लढत होईल.

Web Title: No political party nor effective candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.