पद नको, श्रीरामाची कृपा हवी, नीलम गोऱ्हे यांचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 01:29 AM2021-08-05T01:29:05+5:302021-08-05T01:29:52+5:30
देशभरात कोरोना महामारी संकट ओढवले असून, या परिस्थितीत आपण जीवन जगत आहोत. कोरोना महामारीतून आपण सर्वांनी आरोग्यधर्म, शेजारधर्म याची आठवण ठेवून बाहेर पडावे, यासाठी रामाच्या चरणी नतमस्तक झाल्याचे विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. आम्हाला कोणतेही पद नको आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
पंचवटी : देशभरात कोरोना महामारी संकट ओढवले असून, या परिस्थितीत आपण जीवन जगत आहोत. कोरोना महामारीतून आपण सर्वांनी आरोग्यधर्म, शेजारधर्म याची आठवण ठेवून बाहेर पडावे, यासाठी रामाच्या चरणी नतमस्तक झाल्याचे विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. आम्हाला कोणतेही पद नको आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या गोऱ्हे यांनी सायंकाळी राम मंदिर पूर्व प्रवेशद्वाराजवळ येऊन बंद मंदिराचे बाहेरूनच दर्शन घेतले. यावेळी राम मंदिर विश्वस्त मंदार जानोरकर यांनी श्री काळाराम मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विभागाकडून एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा,
अशी मागणी केली. त्यावर गोऱ्हे यांनीदेखील यासंदर्भात केंद्र शासनाकडे निधीची मागणी करू, असे सांगतानाच
मंदिराला व पर्यावरणाला बाधा येणार नाही, याचा विचार करून पुरातत्व विभागाशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले.