मध्य, उत्तर भारतासाठी रेल्वेचे आरक्षण मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:17 AM2021-09-12T04:17:43+5:302021-09-12T04:17:43+5:30

--------- सुरू असलेल्या रेल्वे * पंचवटी एक्सप्रेस * राज्यराणी एक्सप्रेस * तपोवन एक्सप्रेस * मंगला एक्सप्रेस * ...

No railway reservation for Central, North India! | मध्य, उत्तर भारतासाठी रेल्वेचे आरक्षण मिळेना !

मध्य, उत्तर भारतासाठी रेल्वेचे आरक्षण मिळेना !

Next

---------

सुरू असलेल्या रेल्वे

* पंचवटी एक्सप्रेस

* राज्यराणी एक्सप्रेस

* तपोवन एक्सप्रेस

* मंगला एक्सप्रेस

* जनशताब्दी एक्सप्रेस

* सेवाग्राम एक्सप्रेस

------

उत्तर, मध्य भारताचे तिकीट मिळेना !

* मुंबईवरून सुटणाऱ्या व नाशिकरोडमार्गे जाणाऱ्या नागपूर, सिकंदराबाद, औरंगाबाद, भोपाळ, दिल्ली, बिहार, उत्तरप्रदेश या रेल्वे मार्गावरील जवळपास सर्वच रेल्वेंचे आरक्षण हाऊसफुल्ल होऊ लागले आहेत.

* काही रेल्वेंचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले असून, वेटिंग लिस्ट सुरू झाली आहे.

-----

कुठल्याच मार्गावर गर्दी कमी नाही

रेल्वे प्रशासनाने सर्वसाधारण तिकीट बंद केल्याने सर्व प्रवाशांना आरक्षण कन्फर्म तिकीट काढणे कमप्राप्त झाल्याने सर्वच मार्गांवर वेटिंग लिस्ट सुरू झाली आहे. मात्र, जळगाव - भुसावळ - मुंबई - मनमाड - पाचोरा असा जवळचा प्रवास असल्यावर प्रवासी वेटिंग लिस्टवर स्वत:च्या जबाबदारीवर प्रवास करत आहेत.

-----

नाे मास्क, नाे सोशल डिस्टन्सिंग

* रेल्वेच्या एका बोगीमध्ये ७२ तिकीट असून, रेल्वे प्रशासनाकडून सर्व आरक्षण कन्फर्म तिकीट दिले जात आहे.

* रेल्वेमध्ये प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही.

* प्रवासादरम्यान मास्क न घालणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जात नसल्याने प्रवासात बहुतेकजण मास्क वापरत नाहीत.

* रेल्वे स्थानकावर उतरल्यावर प्रवासी मास्कचा वापर करताना दिसतात.

Web Title: No railway reservation for Central, North India!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.