पावसाची दडी : गंगापूर धरणाचा जलसाठा ७६टक्के; विसर्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 02:27 PM2018-08-01T14:27:37+5:302018-08-01T14:29:02+5:30

पावसाचे प्रमाण या शहरासह जादा पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्येही घटले असून शहरात पुर्णपणे पावसाने विश्रांती घेतली आहे. सोमवारपर्यंत ४०० ते ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग गंगापूरमधून केला जात होता; मात्र जलसंपदा विभागाने बुधवारी(दि.१) हा विसर्गही पुर्णपणे बंद केल्याची माहिती सुत्रांनी दिली

no Rainfall: Gangapur dam reservoir 76%; Off the descharge | पावसाची दडी : गंगापूर धरणाचा जलसाठा ७६टक्के; विसर्ग बंद

पावसाची दडी : गंगापूर धरणाचा जलसाठा ७६टक्के; विसर्ग बंद

Next
ठळक मुद्दे गंगापूर धरणाचा जलसाठा ७६.४५ टक्के गंगापूर धरण समुहात काश्यपी, गौतमी, अंबोळी ही लहान धरणे आहेत

नाशिक : आठवडाभरापासून नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्येही आता वरुणराजा रुसला आहे. गंगापूर धरणाचा जलसाठा ७६.४५ टक्के इतका असून ४ हजार ३०४ दलघफूपर्यंत जलपातळी पोहचली आहे. पावसाने धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात विश्रांती घेतल्याने विसर्ग आता पुर्णपणे थांबविण्यात आला आहे.
पावसाचे प्रमाण या शहरासह जादा पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्येही घटले असून शहरात पुर्णपणे पावसाने विश्रांती घेतली आहे. सोमवारपर्यंत ४०० ते ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग गंगापूरमधून केला जात होता; मात्र जलसंपदा विभागाने बुधवारी(दि.१) हा विसर्गही पुर्णपणे बंद केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गंगापूर धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांनाही पाणी पुरविले जाते. हे धरण ७६ टक्के भरले असून पाण्याची आवक धरणसमुहात थांबल्याने गंगापूर धरणाचा विसर्ग पुर्णत; बंद करण्यात आला आहे. गंगापूर धरण समुहात काश्यपी, गौतमी, अंबोळी ही लहान धरणे आहेत. या धरणांमधून गंगापूर धरणात सुरू असलेला पाण्याचा प्रवाहही पुर्णपणे थांबविला गेला आहे. काश्यपी धरण ८५ टक्के, गौतमी धरण ७१.३८ टक्के भरले आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी पहाटे सहा वाजेपर्यंत २४ तासांत ०.५ मिमी. पावसाची नोंद झाली. अंबोलीच्या परिसरात १६, त्र्यंबकेश्वरमध्ये ०.२ मि.मी इतका पाऊस झाला. यावरुन पावसाचे प्रमाण अचानकपणे कमी झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.
शहर व परिसरात आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. सुर्यप्रकाशही नाशिककरांना जाणवू लागला आहे. दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास शहरात ढग दाटून येत असले तरी पावसाच्या सरींचा वर्षाव होत नाही. शहरात या हंगामात अद्याप ४३१ मि.मी इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान केंद्राकडे आहे.


 

Web Title: no Rainfall: Gangapur dam reservoir 76%; Off the descharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.