प्रतिसाद नाही : येत्या ८ फेबु्रवारीला उघडणार निविदा ‘स्मार्ट रोड’साठी फेरनिविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:34 AM2018-01-31T01:34:24+5:302018-01-31T01:35:08+5:30

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या १.१ कि.मी. मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रुपांतर केले जाणार असून त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांना अवघ्या एकाच एजन्सीकडून प्रतिसाद लाभला.

No Response: rectangle for Tender 'Smart Road' to be opened on February 8 | प्रतिसाद नाही : येत्या ८ फेबु्रवारीला उघडणार निविदा ‘स्मार्ट रोड’साठी फेरनिविदा

प्रतिसाद नाही : येत्या ८ फेबु्रवारीला उघडणार निविदा ‘स्मार्ट रोड’साठी फेरनिविदा

googlenewsNext
ठळक मुद्देप्रतिसाद मिळत नसल्याने कंपनी परेशानवायफायसारख्या सुविधाही उपलब्ध

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या १.१ कि.मी. मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रुपांतर केले जाणार असून त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांना अवघ्या एकाच एजन्सीकडून प्रतिसाद लाभला. त्यामुळे कंपनीने फेरनिविदा काढली असून येत्या ८ फेबु्रवारीला निविदा उघडण्यात येणार आहेत. डिसेंबर २०१७ पासूनच स्मार्ट रोडच्या कामाला सुरूवात करण्याचे नियोजन होते. परंतु, एजन्सीचा प्रतिसादच मिळत नसल्याने कंपनी परेशान झालेली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीमार्फत अशोक स्तंभ ते त्र्यंबकनाका या दरम्यानच्या १.१ कि.मी. मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रूपांतर केले जाणार असून, त्यात आकर्षक पथदीपांसह सायकल ट्रॅक व वायफायसारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी सुमारे १६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आॅक्टोबर २०१७ पासून स्मार्ट रोडसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी महिनाभरात स्मार्ट रोडचे काम प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचा दावा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी केला होता. मात्र, निविदा प्रक्रियेत एकच एजन्सीने प्रतिसाद नोंदवला. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान तीन एजन्सीचा सहभाग अपेक्षित असतो. परंतु, एकच एजन्सी पुढे आल्याने पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कंपनीने स्मार्ट रोडचा आराखडा तयार केलेला असून त्याचे सादरीकरण केपीएमजी या प्रकल्प सल्लागार संस्थेने यापूर्वीच केलेले आहे.
कंपनीवर वाढता दबाव
पुढील वर्षी लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्मार्ट सिटीची संकल्पना काही अंशी तरी जनतेसमोर प्रकट व्हावी, त्यातून काही प्रकल्प पूर्णत्वाला जावेत, याकरीता कंपनीच्या अधिकाºयांवर मोठा दबाव वाढला आहे. सन २०१८ मध्ये जास्तीत जास्त प्रकल्प लोकांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. मात्र, कंपनीचा पायलट प्रोजेक्ट असलेल्या स्मार्ट रोडलाच अद्याप मुहूर्त लागू शकलेला नाही. त्यामुळे कंपनीच्या अधिकाºयांमध्ये अस्वस्थता आहे.

Web Title: No Response: rectangle for Tender 'Smart Road' to be opened on February 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.