रस्ता नाही, आरोग्य उपकेंद्र जवळ नाही; भरपावसात गरोदर मातेला डोलीतून घेऊन जाताना रस्त्यात झाली प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2023 05:57 PM2023-10-01T17:57:32+5:302023-10-01T17:58:07+5:30
अनंत अडचणींचा सामना करावा लागला.
शाम धुमाळ, कसारा: एकीकडे देशभर राजकीय पुढारी व भारतीय जनता स्वतंत्रता अमृत महोत्सव साजरा करतोय तर दुसरीकडे याचं भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील आदिवासी जनता रस्ता,विज,,पाणी ,आरोग्य सारख्या सुविधा पासून वंचित असल्याने गरोदर माता असो वा अन्य गभीर आजारी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी डोली करून 2 किलोमीटर दूरवर पायी प्रवास करावा लागतोय.2 किमी पायी प्रवास व तिथून पुढे वाहणाने इच्छित स्थळी जाण्याची वेळ आदिवासी बांधवावर येत आहे.
शहापूर तालुक्यातील पटकीचा पाडा सुमारे 100 वर्षा पासून वसलेल्या शहापूर तालुक्यातील वेेळूक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या या पाड्यात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने या गावातील नागरिकाना दवाखाना,बाजारहाट साठी,दोन ते अडीच किलोमीटर पायी चालून डोंगर चढ उतार् करीत कसारा गाठन्याची वेळ येत आहे.
आज रविवारी दुपारी रस्ता नसल्याने प्रसूती वेदना होत असताना प्रणाली गुरुनाथ वाजे या गरोदर मातेला डोली करून नेत असताना या आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रस्तूती झाली महीलेने एका गोडस बाळाला जन्म दिला. शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पटकीचा पाडा या आदिवासी पाड्यात जाण्यासाठी रस्ता नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी होती रस्ता नसल्याने येथील रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे आज सकाळी 11 वाजता गरोदर महिलेच्या पोटात दुखायला लागल्याने अंगणवाडी मदतनीस अनिता भवर यांच्या मदतीने तिला कसारा रूग्णालयात नेण्यासाठी डोली करून घेऊन जात आसताना तिला रस्त्यात खूप त्रास होऊ लागला डोली घेऊन जाणाऱ्या आदिवासी बांधवांसोबत काही महिला देखील सोबत होत्या .गरोदर मातेला त्रास होऊ लागल्याने सोबत च्या महिलांनी डोली एका सुरक्षित ठिकाणी थांबवून गरोदर मातेच्या प्रसूती वेदना थांबवण्यासाठी प्रयत्न करीत असताना महिला प्रसूत झाली. प्रशासना च्या हलगर्जी पणा मुळे एका गरोदर मातेस अनंत अडचणी ला सामना करावा लागला .
प्रस्तुती नंतर पुन्हा बाळाला व मातेला डोली करून मुख्य रस्त्यावर 2 किमी पायी येऊन तिथून एका वाहणाने कसारा रूग्णालयात दाखल करण्यात आले कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी पल्लवी आखाडे ,परिचारिका सोनाली सांगळे यांनी तात्काळ बाळ व माता यांच्यावर योग्य उपचार सुरु करून रुग्णालयात दाखल करून घेतले.
अतिदुर्गम पटकीचा पाडा ते वेळूक वॉशाळा असा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर होउन् त्या रस्त्याचे तात्काळ काम सुरु करण्यात यावे यासाठी पाठपुरावा सुरु असून या प्रकरणी मुख्यमंत्री महोदयांना.दूरध्वनी वर संपर्क करून माहिती देण्यात आली असून त्यांनी या प्रकाराची गभीर दखल घेतली आहे. पांडुरंग बरोरा. माजी आमदार.शहापूर