रेल्वे प्रवासाची अफवा नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 10:40 PM2021-04-08T22:40:04+5:302021-04-09T00:29:40+5:30
नाशिक रोड : अतिरिक्त रेल्वे गाड्यांची घोषणा करणे हे रेल्वे सेवेला हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा एक भाग असून, त्यामुळे नागरिकांनी यासंदर्भात अफवांवर विश्वास ठेवून रेल्वेच्या प्रवासासाठी गर्दी करणे टाळावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे उन्हाळ्यात जास्त गाड्या चालवत असते. कोविडच्या गंभीर व आव्हानात्मक परिस्थितीतही अतिरिक्त गाड्या चालविल्या जाणार आहेत. त्याचा गैरअर्थ अथवा पॅनिक बुकिंग असा तर्क काढू नये, असे रेल्वेने म्हटले आहे. कोविड संसर्ग थांबविण्यासाठी फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि निर्धारित स्थानाच्या वेळी कोविडशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे, असेही रेल्वेने म्हटले आहे.