वरिष्ठ निवड श्रेणीपासून कोणीही शिक्षक वंचित राहणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:10 AM2021-07-04T04:10:59+5:302021-07-04T04:10:59+5:30
सिन्नर : वरिष्ठ व निवड श्रेणीचे आतापर्यंत ८२८ प्रस्ताव कार्यालयाकडे प्राप्त झाले असून ५२२ प्रस्ताव मंजूर केले आहेत व ...
सिन्नर : वरिष्ठ व निवड श्रेणीचे आतापर्यंत ८२८ प्रस्ताव कार्यालयाकडे प्राप्त झाले असून ५२२ प्रस्ताव मंजूर केले आहेत व प्रशिक्षणाअभावी १०६ प्रस्ताव प्रलंबित आहेत. मात्र, सदर शिक्षकांकडून हमीपत्र घेऊन तेही प्रस्ताव मंजूर करण्यात येतील, यासाठी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला आहे. लवकरच त्यावर तोडगा निघेल, अशी ग्वाही शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी दिली.
नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व माध्यमिक शिक्षणाधिकारी शिक्षण विभाग यांची संयुक्त सहविचार सभा क्रांतिवीर व्ही.एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेत झनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व्यासपीठावर माध्यमिकचे सुधीर पगार, उपशिक्षणाधिकारी व्ही.आर. बागुल, वेतन पथकाचे अधीक्षक उदय देवरे, पी.यू. पिंगळकर, बोटे, सीताराम हगवणे यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्याध्यापक संघातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी. देशमुख यांनी केले. यावेळी विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक पदोन्नतीस मान्यता देण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी ज्या ठिकाणी सेवाज्येष्ठता व संस्था वादातील प्रकरणे प्रलंबित आहे. मुख्याध्यापक संघाने २२ मार्च रोजी दप्तरदिरंगाईचे पत्र दिले. त्याचे उत्तर अद्याप मिळाले नाही, असा संतप्त सवाल एस.बी. शिरसाठ यांनी मांडला. त्यावर वादळी चर्चा होऊन यापुढे दप्तरदिरंगाई होणार नाही, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीचे प्रलंबित सर्वच प्रस्ताव १५ दिवसांत मार्गी लावले जातील, असे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.के. सावंत, कार्याध्यक्ष एस.बी. शिरसाठ, गुफरान अन्सारी, प्रदीप सांगळे, पुरुषोत्तम रकिबे, परवेजा शेख, अशोक कदम, बी.डी. गांगुर्डे, माध्य. शिक्षक संघाचे अध्यक्ष मोहन चकोर, डी.एस. ठाकरे, एस.ए. पाटील यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. बी.के. सानप यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रदीप सांगळे यांनी आभार मानले.
--------------------------
शासन आदेश आल्यानंतर अध्यापन
शिक्षण विभागाचा आदेश असेपर्यंत अभ्यासक्रम चालू राहील. यावेळी विविध उपक्रमांची माहिती दिली. शासन आदेश आल्यानंतर अध्यापन शाळा सुरू होईल, असे सांगण्यात आले. यानंतर सर्व विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. शाळातपासणी, संचमान्यता, युडायस, नावात बदल प्रस्ताव ॲपची माहिती, एस.एस.सी. परीक्षा गुणदान, दाखला व त्यावरील द्यावयाचा शेरा, पगारबिले, मेडिकलबिले, सेवानिवृतीची प्रकरणे, परतावा व ना परतावा बिले, फरक बिले याबाबत उदय देवरे यांनी सखोल माहिती दिली. एप्रिलमध्ये नियमित बिले मंजूर करण्यात आलेली आहे. त्याची बिले ट्रेझरीमध्ये टाकलेली आहेत. जूनची सूचना दोनतीन दिवसांत मिळेल व सदर बिले १५ जुलैपर्यंत मंजूर होतील, असे आश्वासन उदय देवरे यांनी दिले. प्रत्येक घटकाचा प्रश्न मार्गी लावला जाईल, त्याबाबत शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर (वीर) यांनी मनोगतातून सांगितले.
--------------------------
नाशिक माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली झणकर (वीर) व मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा पार पडली. त्याप्रसंगी सुधीर पगार, व्ही.आर. बागुल, उदय देवरे, एस.के. सावंत, एस.बी. देशमुख, पी.यू. पिंगळकर, बोटे, सीताराम हगवणे, गुफरान अन्सारी, प्रदीप सांगळे आदी. (०३ सिन्नर १)
030721\03nsk_1_03072021_13.jpg
०३ सिन्नर १