Corona Vaccine : मालेगावी सोमवारपासून ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’; ४२ नगरसेवकांनी घेतला पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 12:56 PM2021-12-23T12:56:19+5:302021-12-23T13:02:00+5:30

सोमवारपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच वाडिया व अली अकबर रुग्णालयाच्या नूतनीकरण कामाचे सोमवारी साडेतीन वाजता भूमिपूजन केले ...

‘No vaccine, no entry’ from Monday in Malegaon; The first dose was taken by 42 corporators | Corona Vaccine : मालेगावी सोमवारपासून ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’; ४२ नगरसेवकांनी घेतला पहिला डोस

Corona Vaccine : मालेगावी सोमवारपासून ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’; ४२ नगरसेवकांनी घेतला पहिला डोस

googlenewsNext

सोमवारपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच वाडिया व अली अकबर रुग्णालयाच्या नूतनीकरण कामाचे सोमवारी साडेतीन वाजता भूमिपूजन केले जाणार असल्याची देण्यात आली. शहरात आरोग्य विभागाने ५ लाख ७ हजार १७० नागरिकांना डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते; मात्र आतापर्यंत केवळ २ लाख ८९ हजार ६२० नागरिकांनी कोरोनाचे डाेस घेतले आहेत. यात पहिला डोस २ लाख २४ हजार ८३३ जणांनी, तर दुसरा डोस केवळ ६४ हजार ७८७ जणांनी घेतल्याचे समोर आले आहे तर महापालिकेच्या ८१ नगरसेवकांपैकी केवळ २८ नगरसेवकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत, तर ४२ नगरसेवकांनी केवळ पहिला डोस घेतला आहे.

१९ महिन्यांनंतर ऑफलाइन महासभा

कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव मनपाची महासभा गेल्या १८ जून २०२० रोजी बालाजी लॉन्स येथे झाली होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तब्बल १९ महिने नगरसेवकांनी ऑनलाइन पद्धतीने मनपाच्या महासभेत सहभाग नोंदवला होता. बुधवारी (दि.२२) प्रत्यक्षात सभागृहात सभा झाल्याने नगरसेवकांमध्ये उत्साह दिसून आला.

 

Web Title: ‘No vaccine, no entry’ from Monday in Malegaon; The first dose was taken by 42 corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.