सराफ व्यावसायिकांचा ‘नो व्हेईकल डे’, सायकलवरून येणाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 01:34 PM2021-03-01T13:34:30+5:302021-03-01T13:37:14+5:30

सुवर्णकार समाजाचे आराध्य संतश्रेष्ठ श्री नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत नाशिक सराफ असोसिएशनतर्फे सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्यात आला असून सराफ बाजारात सायकलवरून अथवा पायी येणाऱ्या व्यावसायिकांचे व नागरिकांचे सराफ व्यावसायिकांकडून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. 

‘No Vehicle Day’ of goldsmiths, welcoming cyclists with roses | सराफ व्यावसायिकांचा ‘नो व्हेईकल डे’, सायकलवरून येणाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

सराफ व्यावसायिकांचा ‘नो व्हेईकल डे’, सायकलवरून येणाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

Next

नाशिक : सुवर्णकार समाजाचे आराध्य संतश्रेष्ठ श्री नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत नाशिक सराफ असोसिएशनतर्फे सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्यात आला असून सराफ बाजारात सायकलवरून अथवा पायी येणाऱ्या व्यावसायिकांचे व नागरिकांचे सराफ व्यावसायिकांकडून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. 

नाशिक सराफ असोसिएशनकडून सर्व सराफ व्यावसायिक व कारागीरानी सोमवारी (दि.१) संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार १ मार्च रोजी दैनंदिन व्यवहारांसाठी सराफ बाजारात येताना अनेक व्यावसायिकांनी पायी चालण्याचा पर्याय निवडला. तर काही व्यावसायिकांनी सायकलचा वापर केला, काहींना दूर राहत असल्याने पायी चालने अगदीच शक्य होत नसल्याने त्यांनी वाहनांच्या शेअरींगचा पर्यायाला पसंती दिली. परंतु वाहनाचे वापर करणारे व्यावसायिक अत्यल्प असल्याचे दिसून आले. दरम्यान,  सुदृढ शारीरिक आरोग्याचा संदेश देतानाच, पर्यावरणाला काही पूरक ठरू शकेल, असा उपक्रम राबविण्याच्या विचारातून नाशिक सराफ असोसिएशनने संत श्री नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘नो व्हेईकल डे’ पाळून सामाजिक जबाबदारी जोपासण्याचा निर्धार केल्याचे संघटनेचे अध्यक्ष गिरीश नवसे,  सचिव किशोर वडनेरे, उपाध्यक्ष मेहुल थोरात, प्रमोद चोकसी, योगेश दंडगव्हाळ आदींनी दिली. 

Web Title: ‘No Vehicle Day’ of goldsmiths, welcoming cyclists with roses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.