निवडणूक प्रशिक्षणासाठी नोडल अधिकारी नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:49 AM2019-04-19T00:49:44+5:302019-04-19T00:49:48+5:30
जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रकिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण त्याच बरोबर ईव्हीएम हाताळणीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने बारा नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
नाशिक : जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रकिया पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण त्याच बरोबर ईव्हीएम हाताळणीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने बारा नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गुरुवार, दि. १८ ते २२ या काळात जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्मचाºयांचे द्वितीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात निवडणूक कर्मचाºयांचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने दुसरे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. या प्रशिक्षणात कर्मचारी, अधिकाºयांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची हाताळणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याने त्यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरावरील अधिकाºयांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यात नांदगावसाठी रमेश मिसाळ, कळवण-श्रीमती हेमांगी पाटील, चांदवड-कैलास कडलग, येवला- अर्जुन श्रीनिवास, निफाड-कुंदन सोनवणे, दिंडोरी- नितीन गवळी, सिन्नर- नितीन मुंडावरे, नाशिक पूर्व- आप्पासाहेब शिंदे, नाशिक मध्य-श्रीमती गीतांजली बाविस्कर, नाशिक पश्चिम-विठ्ठल सोनवणे, इगतपुरी-प्रकाश थवील यांचा समावेश आहे. या अधिकाºयांनी त्या विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक अधिकाºयांशी समन्वय साधून प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणे अपेक्षित धरण्यात आले आहे.