मनपा इन्क्युबेटर्स वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:33 AM2017-09-13T00:33:45+5:302017-09-13T00:33:45+5:30
आयुक्त : विनाकारण सिव्हिलला रुग्ण पाठविल्यास कारवाई नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील इन्क्युबेटरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक नवजात अर्भकांवर उपचार करावे लागत असल्याने आॅगस्ट महिन्यात ५५ बालके दगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर महापालिका प्रशासनही या प्रकाराने सावध झाले आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सद्यस्थितीत १७ इन्क्युबेटर्स असून, त्यात आणखी २३ इन्क्युबेटर्सची भर घालणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आयुक्त : विनाकारण सिव्हिलला रुग्ण पाठविल्यास कारवाई
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील इन्क्युबेटरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक नवजात अर्भकांवर उपचार करावे लागत असल्याने आॅगस्ट महिन्यात ५५ बालके दगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर महापालिका प्रशासनही या प्रकाराने सावध झाले आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सद्यस्थितीत १७ इन्क्युबेटर्स असून, त्यात आणखी २३ इन्क्युबेटर्सची भर घालणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महापालिकेच्या रुग्णालयातून विनाकारण शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्ण पाठविले जात असतील तर संबंधित वैद्यकीय अधिकाºयापासून वैद्यकीय अधीक्षकांपर्यंत कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला.
जिल्हा शासकीय रुग्णालयात एका इन्क्युबेटरमध्ये चार-चार नवजात अर्भके कोंबण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यभर त्याबाबत खळबळ उडाली. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली आणि जिल्हा रुग्णालयात इन्क्युबेटर्सची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले. जिल्हा रुग्णालयाच्या या स्थितीमुळे महापालिकेनेही सावधगिरी बाळगत आपल्या रुग्णालयांमधील इन्क्युबेटर्सची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सध्या १७ इन्क्युबेटर्स आहेत. त्यात बिटको रुग्णालयात १०, कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ४, इंदिरा गांधी रुग्णालयात २, तर स्वामी समर्थ रुग्णालयात १ इन्क्युबेटर आहे. आता त्यात आणखी २३ इन्क्युबेटर्स वाढविण्यात येणार आहेत. त्यामध्ये बिटकोत ३, झाकीर हुसेन रुग्णालयात ४, इंदिरा गांधी रुग्णालयात ६, मोरवाडी येथील रुग्णालयात ६, मायको दवाखान्यात २, तर जिजामाता रुग्णालयात २ इन्क्युबेटर्सची संख्या वाढविली जाणार आहे. महापालिका रुग्णालयात इन्क्युबेटर्स रिकामे असताना विनाकारण जिल्हा रुग्णालयात नवजात अर्भक पाठविण्याचा प्रकार समोर आल्यास संबंधित वैद्यकीय अधिकाºयासह वैद्यकीय अधीक्षकावरही कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला.आॅगस्टमध्ये पाठविले २२ अर्भकजिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये महापालिकेच्या रुग्णालयांमधून मोठ्या प्रमाणावर नवजात अर्भक इन्क्युबेटर्समध्ये ठेवण्यासाठी पाठविले जात असल्याचा आरोप केला जातो आहे. त्या आरोपांचा स्पष्ट शब्दात इन्कार करत आयुक्तांनी सांगितले, आॅगस्ट महिन्यात जिल्हा रुग्णालयात १२९ नवजात अर्भक दाखल झाले. त्यातील केवळ २२ अर्भक हे महापालिका रुग्णालयांतून पाठविण्यात आलेले आहेत, तर प्राथमिक आरोग्य केंद्रातून ३३, ग्रामीण रुग्णालयातून ५२, उपविभागीय रुग्णालयातून १६, तर खासगी रुग्णालयातून ६ नवजात अर्भक दाखल झालेले होते. महापालिकेच्या बिटको रुग्णालयावर ग्रामीण भागातील रुग्णांचा भार वाढत असल्याचेही यावेळी आयुक्तांनी सांगितले.