मनपा निवडणूक अधिकारी नियुक्त

By admin | Published: January 3, 2017 01:43 AM2017-01-03T01:43:44+5:302017-01-03T01:43:58+5:30

महापालिका निवडणूक : निवडणूक आयोगाचे आदेश

Nominated by Election Officer | मनपा निवडणूक अधिकारी नियुक्त

मनपा निवडणूक अधिकारी नियुक्त

Next

नाशिक : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीप्रमाणेच नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विभागीय आयुक्तांनी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होताच, या अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती केली जाईल. राज्य आयोगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली असून, त्याचे पालन करताना नाशिक विभागातील पर जिल्ह्यांमधून अधिकाऱ्यांची कुमक मागवावी लागली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमताना उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, असे आयोगाचे आदेश आहेत. त्यातही असे अधिकारी नेमताना तो स्थानिक जिल्ह्याचा रहिवासी नसावा त्याचबरोबर तो एकाच जागेवर तीन वर्षे कार्यरत नसावा, शिवाय त्याचे जिल्ह्यात चार वर्षे वास्तव्य नसावे, असे निकष घालून देण्यात आल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता.

Web Title: Nominated by Election Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.