विधान परिषदेसाठी राष्टÑवादीकडून सहाणे यांचे नामांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:33 AM2018-05-03T01:33:04+5:302018-05-03T01:33:04+5:30
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी बुधवारी राष्ट्रवादी कॉँगे्रसच्या वतीने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले शिवाजी सहाणे यांनी नामांकन दाखल केले. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची गुरुवारी अंतिम मुदत असून, शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे हे अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, या निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून, राष्टÑवादी विरुद्ध शिवसेना अशी दुरंगी लढत रंगणार आहे.

शिवसेनेकडून गेल्या वेळी शिवाजी सहाणे यांनी विधान परिषदेची निवडणूक लढविली होती. समसमान मते मिळाल्याने या निवडणुकीत राष्टÑवादीचे जयंत जाधव यांना विजयी घोषित करण्यात आले होते. तेव्हापासूनच सहाणे यांच्याकडून विधान परिषदेवर दावा सांगितला जात असताना पक्षाने मात्र ऐनवेळी जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर करून सहाणे यांची पक्षातून हकालपट्टी केली. सहाणे यांनी मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करून उमेदवारीसाठी भाजपा व राष्टÑवादीकडे प्रयत्न चालविले होते. त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली. राष्टÑवादी कॉँग्रेसकडेही सक्षम उमेदवार नसल्याने त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी वरिष्ठ पातळीवरून सूत्रे फिरली व शिवाजी सहाणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर बुधवारी सकाळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सहाणे यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.
दुपारी दोन वाजता शिवाजी सहाणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांच्याकडे आपले नामांकन दाखल केले. यावेळी त्यांच्या समवेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जयंत जाधव, आमदार अपूर्व हिरे, रवींद्र पगार, रंजन ठाकरे, दिलीप बनकर, श्रीराम शेटे, गजानन शेलार आदी पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. गुरुवारी निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिवस असून, शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे हे अर्ज दाखल करणार आहेत.