नामको बॅँकेची निवडणूक जाहीर ; २३ डिसेंबरला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 01:57 AM2018-11-06T01:57:15+5:302018-11-06T01:57:31+5:30
उत्तर महाराष्टतील सर्वात मोठी मल्टिस्टेट शेड्यूल्ड बॅँक असलेल्या नाशिक मर्चण्ट को-आॅप. बॅँकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून, येत्या २३ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील प्रारूप तयार केले असले तरी येत्या १९ नोव्हेंबर रोजी विशेष सभा बोलविण्यात आली असून त्यात शिक्कामोर्तब होणार आहे.
नाशिक : उत्तर महाराष्टतील सर्वात मोठी मल्टिस्टेट शेड्यूल्ड बॅँक असलेल्या नाशिक मर्चण्ट को-आॅप. बॅँकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून, येत्या २३ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील प्रारूप तयार केले असले तरी येत्या १९ नोव्हेंबर रोजी विशेष सभा बोलविण्यात आली असून त्यात शिक्कामोर्तब होणार आहे. येत्या १९ नोव्हेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यानच उमेदवारी अर्ज स्वीकृतीस प्रारंभ होणार असून, २७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. २९ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. वैध उमेदवारांची यादी दुसºयाच दिवशी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येईल. १ ते ४ डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. २३ डिसेंबर रोजी मतदान होईल आणि २६ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
निकाल २८ डिसेंबरच्या विशेष सर्वसाधारण सभेत घोषित करण्यात येणार आहे.
२१ जागांसाठी निवडणूक
नामको बॅँकेच्या एकूण २१ जागांसाठी निवडणूक होणार असून त्यात सर्वसाधारण गटात १८, अनुसूचित जाती-जमाती गटातून १, महिला राखीव गटातून २ याप्रमाणे संचालकांच्या जागा असतील.