नामपूरचा विवेक धांडे स्पर्धा परीक्षेत मागासवर्गीयांत प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:01 AM2018-01-09T00:01:08+5:302018-01-09T00:03:06+5:30

नामपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट-क या पदाच्या ३०० जागांसाठी सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत बागलाण तालुक्यातील नामपूर येथील विवेक पंडितराव धांडे या विद्यार्थ्याने इतर मागासवर्ग गटातून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.

Nomura's Vivek Dhande Competitive Examination for Backward Classes First | नामपूरचा विवेक धांडे स्पर्धा परीक्षेत मागासवर्गीयांत प्रथम

नामपूरचा विवेक धांडे स्पर्धा परीक्षेत मागासवर्गीयांत प्रथम

Next
ठळक मुद्दे विवेकच्या यशाचे कौतुक पूर्व परीक्षेसाठी दोन लाख २९ हजार ६५ उमेदवार ४३४५ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र

नामपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट-क या पदाच्या ३०० जागांसाठी सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत बागलाण तालुक्यातील नामपूर येथील विवेक पंडितराव धांडे या विद्यार्थ्याने इतर मागासवर्ग गटातून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.
लोकसेवा आयोगातर्फे २४ सप्टेंबर २०१७ रोजी दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट-क पदासाठी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल सोमवारी (दि. ८) जाहीर करण्यात आला. विवेक धांडे याने इतर मागासवर्ग गटातून प्रथम क्रमांक पटकावला.
यांत्रिकी शाखेतून अभियांत्रिकी पदवी प्राप्त करणाºया विवेकने या परीक्षेसाठी पुणे शहरात राहून तयारी केली होती. विवेकचे वडील नामपूर येथील शाळेत उपशिक्षक असून, एका शिक्षकाच्या मुलाने राज्यस्तरावर यश संपादन केल्याने परिसरात विवेकच्या यशाचे कौतुक होत आहे. राज्य उत्पादन शुल्क गट-क या पदाच्या ३०० जागांसाठी निवड प्रक्रियेच्या पूर्व परीक्षेसाठी दोन लाख २९ हजार ६५ उमेदवार प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४३४५ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या निकालाच्या आधारे अंतिम ३०० उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध अभ्यास व आई-वडिलांची प्रेरणा यामुळेच मी हे देदीप्यमान यश मिळवू शकलो. यापुढेही अधिक अभ्यास करून पुढील परीक्षांमध्ये यश संपादन करणार आहे.
- वैभव धांडे, नामपूर

Web Title: Nomura's Vivek Dhande Competitive Examination for Backward Classes First

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक