कळवणला होणार सामान्य रु ग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:55 PM2020-01-21T23:55:02+5:302020-01-21T23:55:54+5:30
कळवण : १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार व योग्य आरोग्य सुविधा मिळविण्याच्या दृष्टीने कळवण उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांच्या सामान्य रु ग्णालयात रूपांतर करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाला दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार व योग्य आरोग्य सुविधा मिळविण्याच्या दृष्टीने कळवण उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांच्या सामान्य रु ग्णालयात रूपांतर करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाला दिले.
आमदार नितीन पवार यांनी कळवण व सुरगाणा तालुक्यातील आरोग्यविषयक प्रश्नासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मंत्रालयात भेट घेऊन कळवण उपजिल्हा रुग्णालयाचे सामान्य रुग्णालयात रूपांतर करण्याचे निवेदन दिले. टोपे यांनी सकारात्मक चर्चा करून सामान्य रुग्णालयासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे लेखी निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले.
गेल्या महिन्यात कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयातील कामकाज व अडीअडचणी जाणून घेतल्या होत्या. उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या अपूर्ण वैद्यकीय यंत्रणेमुळे कळवण तालुक्याशेजारील तालुक्यातून येणाऱ्या रुग्णांची नाराजी ओढवली जात असल्याचे भेटीदरम्यान समोर आले होते. टोपे यांनी दिलेल्या लेखी निर्देशामुळे प्रस्ताव सादर करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. एकाच ठिकाणी सर्व सुविधाकळवण उपजिल्हा रु ग्णालयात सुरगाणा, बागलाण, चांदवड, देवळा तालुक्यातील रु ग्ण मोठ्या प्रमाणात येत असून, वैद्यकीय क्षेत्राला लाभलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पाठबळ उपजिल्हा रुग्णालयाला लाभल्याने त्याचा रु ग्णांना फायदा होतो. उपजिल्हा रु ग्णालयाचे सामान्य रु ग्णालयात रूपांतर केल्याने परिसरातील जनतेला कळवण येथे एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळणे शक्य होईल. रु ग्णालयात दाखल झालेल्या अत्यवस्थ व इतर रु ग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक किंवा इतर ठिकाणी स्थलांतरित करणे टाळता येऊन रु ग्णाचे जीव वाचवणे शक्य होईल. कळवण तालुक्यात अभोणा येथे ग्रामीण रु ग्णालय व ९ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, परिसरात २५ शासकीय आश्रमशाळा तसेच अतिपर्जन्यवृष्टीचा तालुका म्हणून ओळखला जातो. सप्तशृंगगडावर वर्षातून दोन वेळा यात्रोत्सव भरत असून, भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने कळवण येथे सामान्य रु ग्णालयाची आवश्यकता आहे. त्यामुळे कळवण उपजिल्हा रु ग्णालयाचे सामान्य रु ग्णालयात रूपांतर करावे, असे निवेदनात नमूद केले आहे.