उत्तर महाराष्ट्रस्तरीय रॉयल श्री झालेला दीपक डंबाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 11:57 PM2020-03-02T23:57:30+5:302020-03-02T23:58:23+5:30
दिंडोरी : येथील रॉयल फिटनेस क्लबने आयोजित केलेल्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय रॉयल श्री दिंडोरी २०२० ही बॉडीबिल्डिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. दीपक डंबाळे या नाशिकच्या शरीरसौष्टवपटूने रॉयल श्री दिंडोरी हा किताब पटकाविला. मोस्ट इम्पुव्हड बॉडीबिल्डर म्हणून साकीब शेख नाशिक याची तर बेस्ट पोझर म्हणून नितीन बागुल, नाशिक याची निवड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : येथील रॉयल फिटनेस क्लबने आयोजित केलेल्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय रॉयल श्री दिंडोरी २०२० ही बॉडीबिल्डिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. दीपक डंबाळे या नाशिकच्या शरीरसौष्टवपटूने रॉयल श्री दिंडोरी हा किताब पटकाविला. मोस्ट इम्पुव्हड बॉडीबिल्डर म्हणून साकीब शेख नाशिक याची तर बेस्ट पोझर म्हणून नितीन बागुल, नाशिक याची निवड झाली.
स्पर्धेसाठी खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, दिंडोरीचे माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, डॉ. मयूर पाटील, आबासाहेब तांबे, चंद्रकांत राजे, नरेंद्र जाधव, करण गायकर, नितीन रोटे पाटील, विशाल परदेशी, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष श्याम हिरे, सोमनाथ जाधव, रवि जाधव, धनंजय काळे, राजेंद्र सातपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवर गेस्ट पोझर्सचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून राजेंद्र सातपूरकर, प्रकाश दाभाडे, हेमंत साळवे, नदिम खान, संजय जाधव यांनी काम पाहिले तर गुणलेखक म्हणून किशोर सरोदे यांनी काम पाहिले. स्टेज मार्शल म्हणून मिलिंद रहाणे व सागर येवले यांनी काम पाहिले.
राजेंद्र सातपूरकर यांनदिंडोरी : शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्टÑातून स्पर्धकांचा सहभागनाशिकचा डंबाळे रॉयल श्रीी उत्कृष्ट आयोजनासाठी आयोजकांचे कौतुक केले व पुढील वर्षीही स्पर्धा आयोजनासाठी उत्साह वाढविला.
स्पर्धेचे आयोजन रॉयल फिटनेस क्लब दिंडोरीचे संचालक हेमचंद्र मोरे, संदीप देशमुख, नगरसेवक तुषार वाघमारे यांनी केले होते. हिरामण आहेर, शोएब शेख, अक्षय देशमुख, सागर देशमुख, मोहसिन मिर्जा, राहुल उफाडे, गणेश शिंदे, शेखर कदम, सुरेश चौधरी, पुष्कर कोल्हे, अनिल हिरे आदींनी संयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. प्रा.धनंजय देशमुख यांनी सूत्रसंचालन केले व आभार संचालक हेमचंद्र मोरे यांनी मानले.मने जिंकलीआंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू व भारत श्री स्नेहल कोकणे पाटील, दिव्यांग गटातील महाराष्ट्र श्री मयूर देवरे व ज्युनिअर मिस्टर इंडिया शिवा बागल हे नामांकित शरीरसौष्टवपटू स्पर्धेचे प्रमुख आकर्षण होते. याप्रसंगी या सर्व नामांकित शरीरसौष्टवपटूंनी गेस्ट पोझर म्हणून पोझिंग करून प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी मनोगत व्यक्त करताना स्नेहल कोकणे पाटील यांनी समाजाने मुलींनाही बॉडीबिल्डिंगसाठी प्रोस्ताहित केले पाहिजे, असे मत व्यक्त केले.