सिन्नरचा उत्तर भाग पावसाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 10:12 PM2020-08-08T22:12:22+5:302020-08-09T00:14:17+5:30
नायगाव : पावसाळा शेवटच्या चरणापर्यंत पोहोचत असताना सिन्नर तालुक्याचा उत्तर भाग अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नायगाव खोऱ्यावर रुसलेल्या पावसामुळे सध्या खरिपाची वाताहत होत असतानाच आगामी रब्बी हंगामाच्या आशाही धूसर होऊ लागल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

पावसाचा चार महिन्यांचा मोसम उत्तरार्धाकडे कलला आहे. ज्या दिवसांमध्ये सिन्नरच्या उत्तर भागातील सर्वच नदी-नाले प्रवाहित होऊन विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. यंदा मात्र परस्थिती वेगळी आहे. नायगाव खोºयातील नायगाव, जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, सैनगिरी व जोगलटेंभी आदी शिवारात आत्तापर्यंत एकही जोरदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे सर्वच बंधारे, नदी-नाले आजही कोरडेठाक आहेत. परिणामी परिसरातील विहिरींनी उन्हाळ्यात गाठलेला तळ आजही कोरडाठाक आहे. त्यामुळे पावसाच्या भरवशावर पेरणी केलेले सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूग आदींसह सर्वच पिके सध्या भुई धरूनच आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खरिपाचा हंगाम वाचविण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहे.यंदा समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता त्याप्रमाणे अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. मात्र नायगाव खोºयात अजून एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतित आहे. मात्र नायगाव खोरे वगळून इतरत्र पडत असलेला जोरदार पाऊस नायगावकरांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.