मजूरही नाही, मशीनही नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:22 PM2020-03-30T23:22:55+5:302020-03-30T23:22:55+5:30
येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतीकामांसाठी मजूर नाही, मशिनरी यंत्रणाही उपलब्ध होत नाही यामुळे शेतीकामे ठप्प झाली असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या तालुक्यात गहू सोंगणीवर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतीकामांसाठी मजूर नाही, मशिनरी यंत्रणाही उपलब्ध होत नाही यामुळे शेतीकामे ठप्प झाली असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या तालुक्यात गहू सोंगणीवर आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असून, भीतीने मजूर कामावर यायला तयार नाही. तर गहू सोंगणीसाठी हार्वेस्टर ही उपलब्ध होत नाही त्यामुळे गहू उत्पादक शेतकरी कोंडीत सापडला आहे.
मजुरीचे दर वाढल्याने मजुरांऐवजी गहू सोंगणीसाठी शेतकरी हार्वेस्टर मशीनला पसंती देतात, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परप्रांतातून आलेले हार्वेस्टर मशीन गावाकडे परतले, स्थानिक आहेत ते भीतीपोटी रिस्क घ्यायला तयार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
यावर्षी अल्प पावसावर शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली. पाणीटंचाईचे संकट आल्याने गहू उत्पादनात घट झाली आहे. त्यास अवकाळी पावसाचाही फटका बसला आहे. जे काही हाती लागेल ते पदरात पाडून घ्यायचे म्हटले तर मजूर यायला तयार नाही, मशीनही नाही यामुळे गहू काढावा कसा, असा प्रश्न गहू शेतकऱ्यांना पडला आहे.