सुविधांची नव्हे, बसेसची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:15 AM2021-09-23T04:15:43+5:302021-09-23T04:15:43+5:30
भगवान गायकवाड दिंडोरी : दिंडोरी तालुक्याचे ठिकाण असूनही येथे बस आगार नसल्याने येथील बस नियंत्रण हे पेठ आगारावर, तर ...
भगवान गायकवाड
दिंडोरी : दिंडोरी तालुक्याचे ठिकाण असूनही येथे बस आगार नसल्याने येथील बस नियंत्रण हे पेठ आगारावर, तर बससेवा पेठ व पिंपळगाव आगारावर अवलंबून आहे. येथील बसस्थानकात मागील काळात रस्त्यांचे व देखभाल दुरुस्तीची कामे झाल्याने सुविधांचा वानवा नसली तरी बसचा मात्र नेहमीच वानवा आहे. सध्या नाशिक - कळवण मार्गावरील बसवगळता अन्य बससेवा कमी प्रमाणात आहे. पेठ व पिंपळगाव आगाराने पूर्वरत बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे.
बसस्थानकात देखभाल दुरुस्तीची कामे झाल्याने परिस्थितीत चांगली आहे. येथे अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेले सुलभ शौचालयाचे काम होऊन त्याचे कंत्राट दिल्याने परिस्थिती सुधारली आहे. सध्या दोनच कंट्रोलर असून, अजून एक कंट्रोलर पास देण्यासाठी तसेच स्थानकप्रमुखांची गरज आहे. येथे स्वच्छता कर्मचारी नेमलेले आहे; मात्र बसस्थानकाचा आवाका पाहता अजून कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. येथील बसस्थानक कार्यालय सायंकाळी बंद होते. रात्रीच्या वेळी बस स्थानकात येत नाहीत. बसस्थानकाच्या मागील बाजू वापरात नसल्याने येथे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत आहे. येथील जागा सीएनजी पंप व पार्किंगसाठी देण्याची वदंता आहे. बसस्थानकाच्या पश्चिमेला पेव्हर ब्लॉक बसवले आहेत; मात्र येथे काही ठिकाणी गवत वाढले असून, ते काढण्याची गरज आहे. गेल्या वर्षीच्या कोरोनाकाळापासून बसस्थानकास घरघर लागली आहे. अनेक गावांची बससेवा बंद असल्याने व शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांनी गजबजलेले बसस्थानक सुनेसुने आहे.
-----------------
सुरक्षा रामभरोसे
येथील बसस्थानकात चौकीदार नसल्याने येथील सुरक्षा रामभरोसे असून, चौकीदाराची गरज आहे. पोलिसांनी येथे गस्त घालत गैरप्रकारांना आळा घालणे गरजेचे आहे. नव्याने प्रतीक्षालाय व हिरकणी कक्ष बांधले आहेत, मात्र ते अद्याप उद्घाटनेच्या प्रतीक्षेत आहे. येथे मध्यंतरी एसटीचे उपाहारगृह चालकास परवडत नसल्याने ते बंद झाले होते, ते गेल्यावर्षी सुरू झाले मात्र तेही कोरोनाच्या चक्रव्यूहात सापडल्याने व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. आवारात रसवंती, सलून, जनरल स्टोअर, दूध दुग्धजन्य पदार्थ विक्री आदी दुकाने आहे; मात्र तेही व्यवसायाअभावी बंद असून, त्यातील काहींनी बंद केले आहे.
----
दिंडोरी बसस्थानकात सर्व सुविधा उपलब्ध आहे, मात्र कोरोनाकाळापासून बससेवा कमी झाली आहे. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. बंद असलेले बस मार्ग सुरू करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. तेथे बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या मार्गावर शाळा सुरू झाल्या आहे, तेथे मानव संसाधन अंतर्गत बससेवा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना पास देणे सुरू केले आहे.
- एम.व्ही. महाले, बसस्थानकप्रमुख, दिंडोरी (२२ दिंडोरी बस)
220921\22nsk_11_22092021_13.jpg
२२ दिंडोरी बस