अच्छे दिन नव्हे; भूलथापा
By admin | Published: February 15, 2017 11:21 PM2017-02-15T23:21:02+5:302017-02-15T23:21:18+5:30
सुप्रिया सुळे : येवला येथे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याची टीका
येवला : शेतीमालाचे गडगडलेले भाव, महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था या सर्व बाबींवर भाजप सरकार अपयशी ठरले असून जनतेला अच्छे दिन च्या थापा मारणाऱ्या भाजपा सरकारच्या काळात शेतकरी, मजुर व सामान्य जनतेच्या पदरी निराशा पडली असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
येथे आयोजित येवला तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. आमदार पंकज भुजबळ यांनीही यावेळी सरकारच्या धोरणावर टिका केली.
यावेळी व्यासपीठावर आमदार पंकज भुजबळ, आमदार जयंत जाधव, महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, जेष्ठ नेते श्रीराम शेटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, अंबादास बनकर, तालुका अध्यक्ष साहेबराव मढवई, माजी सभापती किसन धनगे, पंचायत समिती सदस्य हरिभाऊ जगताप, बाबासाहेब देशमुख, सचिन कळमकर, बाळासाहेब लोखंडे आदींसह मोठ्या संखेने राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
अंदरसूल गटाचे उमेदवार महेंद्र कुमार काले, अंदरसूल गणातील उमेदवार डॉ स्वाती सोनवणे, भारती सोनवणे आदि सह तालुक्यातील सर्व उमेदवार उपस्थित होते. सूत्रसंचलन शिवाजी भालेराव यांनी केले. (वार्ताहर) येवला येथील प्रचारसभेत बोलताना सुप्रिया सुळे. समवेत पंकज भुजबळ व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे पदाधिकारी.