रिअ‍ॅलिटी शो नव्हे, हे अनरिअल शो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 01:33 AM2019-06-12T01:33:36+5:302019-06-12T01:34:03+5:30

सध्या चॅनल्सवर मुलांच्या गायनाचे रिअ‍ॅलिटी शोंचे प्रमाण वाढले असले तरी असे कार्यक्रम ‘रिअल’ नसून ‘अनरिअल’ वाटतात. त्याचप्रमाणे मुलांना अभिजात संगीताचे शिक्षण असले पाहिजे, हा वारसा पुढे जोपासला गेला पाहिजे, असे मत प्रख्यात शास्त्रीय गायक पं. अजय पोहनकर यांनी व्यक्त केले.

Not Reality Show, This Unreal Show! | रिअ‍ॅलिटी शो नव्हे, हे अनरिअल शो!

रिअ‍ॅलिटी शो नव्हे, हे अनरिअल शो!

Next
ठळक मुद्देपंडित पोहनकर : अभिजात संगीताचा वारसा जोपासण्याची गरज

नाशिक : सध्या चॅनल्सवर मुलांच्या गायनाचे रिअ‍ॅलिटी शोंचे प्रमाण वाढले असले तरी असे कार्यक्रम ‘रिअल’ नसून ‘अनरिअल’ वाटतात. त्याचप्रमाणे मुलांना अभिजात संगीताचे शिक्षण असले पाहिजे, हा वारसा पुढे जोपासला गेला पाहिजे, असे मत प्रख्यात शास्त्रीय गायक पं. अजय पोहनकर यांनी व्यक्त केले.
गेली सहा दशके गायन क्षेत्रात योगदान देणाऱ्या पंडितजींनी मंगळवारी (दि.१०) शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले त्यानंतर नाशिकमध्ये मुक्काम केला. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी अनेक विषयांवर मुक्त संवाद साधला. वयाच्या नवव्या वर्षी मोठ्या गायकांसमोर गाणाºया पंडितजींचे त्यावेळी केवळ कौतुकच झाले नाही तर इतक्या लहान वयात त्यांनी आदर प्राप्त केला. त्यांची संगीत सेवा अव्याहत सुरूच आहे.
देशाला शास्त्रीय गायकीची मोठी परंपरा आहे. त्यामुळे या गायकीच्या वारसा दीर्घकाळ टिकणारच असे खात्रीलायक सांगणाºया पंडितजींनी नवीन पिढीत काही चांगले गायक, संगीतकार आहेत, त्यांना काही ना काही करावेसे वाटते ही चांगली बाब आहे. राहुल देशपांडे, राकेश चौरसिया अशी अनेकांची नावे घेता येतील असे त्यांनी आवर्जून सांगितले. नवीन पिढीची वाटचाल चांगली सुरू आहे, असे सांगताना त्यांनी चॅनल्सवरील रिअ‍ॅलिटी शोच्या नावाखाली चालणाºया अनेक गायनाचे कार्यक्रम वास्तविक वाटत नाही. अनेकदा जज देखील संयुक्तिक नसतात. कलावंतांना त्यांच्या गायकीपेक्षा मोेठे करताना असे स्पर्धक गायक लोकप्रिय होतात; मात्र लोकप्रियतेचे निकष वेगळे असतात. लोकप्रिय होणे म्हणजे गायनाचा दर्जा असतोच असे नाही त्यामुळे लोकप्रियतेपेक्षा गायनाच्या दर्जावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
संगीत शिक्षण देणाºया संस्था वाढल्या आहेत. परफॉर्मिंग आर्ट्सची कॉलेजेस वाढत आहेत; परंतु त्यातून किती जण पुढे येतात किंवा तग धरू शकतात हा महत्त्वाचा भाग आहे. नव्या पिढीत खूप टॅलेंट आहे; परंतु तो पीआर किंवा लोकप्रियतेशी जोडला जातो, ते टाळले पाहिजे असेही पंडितजी म्हणाले.
तर ईश्वराकडे सुरांचे वरदान मागा...
४रिअ‍ॅलिटी शोमध्ये गायकांना गाणे म्हटल्यानंतर एसएमएससाठी प्रेक्षकांना आवाहन करावे लागते. येणाºया एसएमएसवर निकाल ठरविला जातो, हा प्रकार खटकणारा असल्याचे सांगतानाच पंडित पोहनकर यांनी एसएमएससाठी स्पर्धकांनी आवाहन करण्यापेक्षा ईश्वराकडे सुरांचे वरदान मागा, असे मत व्यक्त केले.

Web Title: Not Reality Show, This Unreal Show!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.