नोटरी वकिलांनी प्रामाणिकपणे काम करावे : न्यायमूर्ती ठिपसे

By Admin | Published: January 14, 2015 01:10 AM2015-01-14T01:10:03+5:302015-01-14T01:10:30+5:30

नोटरी वकिलांची राज्यस्तरीय परिषद

Notary advocates should work honestly: Justice Chips | नोटरी वकिलांनी प्रामाणिकपणे काम करावे : न्यायमूर्ती ठिपसे

नोटरी वकिलांनी प्रामाणिकपणे काम करावे : न्यायमूर्ती ठिपसे

googlenewsNext

  नाशिक : दस्त नोंदणी प्रकरणात पोलिसांनी काही नोटरी वकिलांवर कारवाई केली असून, ही अतिशय गंभीर बाब आहे़ पोलिसांच्या त्रासापासून व कारवाईपासून वाचण्यासाठी नोटरी वकिलांनी प्रामाणिकपणे आपले काम करावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय ठिपसे यांनी तळेगाव दाभाडेत नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय परिषदेत बोलताना केले़ या परिषदेसाठी नाशिक जिल्'ातील ६५ वकील सहभागी झाले होते़ ठिपसे पुढे बोलताना म्हणाले की, दस्त प्रमाणित करण्याचे काम नोटरी वकील इंग्रजांच्या काळापासून करीत आले आहेत़ नोटरी वकिलांना न्यायालयाचे आदेशाप्रमाणे कोर्ट कामकाजात पुरावा नोंदण्याचे अधिकार आहेत़ बऱ्याचदा नोटरी वकिलांनी प्रमाणित केलेले व नोंदविलेले दस्त न्यायालयात वादग्रस्त ठरतात़ तसेच तक्रारदाराच्या तक्रारीमुळे पोलीस कारवाईस सामोरे जावे लागते़ नोटरी अ‍ॅक्ट कलम १३ प्रमाणे नोटरी वकिलांना अशा कारवाईपासून संरक्षण आहे़ तथापि नोटरी वकिलांनी आपली कृती प्रामाणिक आहे व कायदेशीर तरतुदींचे योग्य पालन केलेले आहे अशी स्वरूपात नोटरीचे कार्य प्रामाणिकपणे करावे असा सल्लाही ठिपसे यांनी दिला़

Web Title: Notary advocates should work honestly: Justice Chips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.