अवैध पाणीउपसा करणाऱ्या २३ शेतकऱ्यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:14 AM2019-04-14T00:14:44+5:302019-04-14T00:17:44+5:30
देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने कोलथी नदीपात्रात असलेल्या केटीवेअर, वसंत बंधारा परिसरात अवैध वीजपंप तसेच अनधिकृत विहिरींचे खोदकाम करून पाण्याचा उपसा करणाºया २३ शेतकºयांना नोटीस बजावल्या आहेत. अवैध उपसा करणाºयांवर ग्रामपंचायत प्रशासन यापुढे कठोर कारवाई करेल, असे संकेत दिले आहेत. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पाऊस कमी झाल्याने चणकापूर उजव्या कालव्याला सोडलेल्या पूर- पाण्यावरच वाजगावचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. यामुळे चणकापूर उजव्या कालव्याचे कोलथी नदीत पडणारे पाणी या नदीवर असणाºया एक केटीवेअर व दोन वसंत बंधाºयात साठवण्यात येते. हे केटीवेअर वाजगाव ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्यामुळे त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे आहे. पाण्याचे हे स्रोत गावाची पिण्याच्या पाण्याची गरज भागवितात. गतवर्षी चणकापूर उजव्या कालव्याला सोडलेल्या पूरपाण्यामुळे हे बंधारे व केटीवेअर पाण्याने भरलेले होते. काही शेतकºयांनी या बंधाºयांमध्ये अनधिकृत विहिरी खोदल्या आहेत, अवैध वीजजोडण्या करून पंपाद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करून हे बंधारे कोरडे केले होते. अनधिकृतरीत्या पाण्याचा उपसा करणाºयांवर आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करून बंदोबस्त करावा, अशी मागणी वाजगाव ग्रामपंचायतीने तहसीलदार, वीज वितरण कंपनी व गटविकास अधिकारी देवळा यांच्याकडे केली आहे. तशा आशयाचे पत्र संबंधित विभागांना देण्यात आले आहे.