३६ हजार पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:29 AM2018-12-16T00:29:26+5:302018-12-16T00:29:51+5:30

पाणी दर बुडविण्याचा प्रयत्नात असलेल्या सुमारे ३६ हजार थकबाकीदारांना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. कारण थकबाकीची रक्कम सुमारे ४५ कोटींच्या घरात पोहचलेली असून पाणीपुरवठा विभागाची झोप आता उडाली आहे. यामुळे प्रशासनाने नोटिसा बजावून धडक कारवाईचा इशारा ‘त्या’ मिळकतधारकांना दिला आहे.

Notice to 36 thousand water tanker defaulters | ३६ हजार पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटिसा

३६ हजार पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटिसा

Next
ठळक मुद्देपाणीपुरवठा विभाग : सुमारे ४५ कोटींची थकबाकी; प्रशासनाची कारवाई

नाशिक : पाणी दर बुडविण्याचा प्रयत्नात असलेल्या सुमारे ३६ हजार थकबाकीदारांना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. कारण थकबाकीची रक्कम सुमारे ४५ कोटींच्या घरात पोहचलेली असून पाणीपुरवठा विभागाची झोप आता उडाली आहे. यामुळे प्रशासनाने नोटिसा बजावून धडक कारवाईचा इशारा ‘त्या’ मिळकतधारकांना दिला आहे.
महापालिके च्या पाणीपुरवठा विभागाला नवनियुक्त आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सुमारे ६० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट दिल्याने पाणीपुरवठा विभाग खडबडून जागे झाले आहे. यामुळे पाणीपुरवठा प्रशासनाने धडक कारवाई राबविण्याची तयारी केली आहे. या अनुषंगाने पाणीपुरवठा विभागाने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. शहरात पाणीपट्टीची रक्कम थकविणाऱ्यांचा आकडा ३६ हजारांच्या घरात आहे. यामुळे पाणीपुरवठा विभागापुढे आव्हान निर्माण झााले आहे. मागील अनेक वर्षांपासून मिळकतधारकांकडे थकबाकी असून, पाणीपुरवठा विभागाने याकडे कधीही गंभीर्याने लक्ष दिले नाही. आयुक्तांनी दिलेले उद्दिष्ट मार्चअखेर पूर्ण करावयाचे असल्याने आता मात्र या विभागाची धावपळ होत आहे. मागील ३३ कोटी आणि चालू देयकापोटी १२ कोटी अशी एकूण ४५ कोटींची थकबाकीची रक्कम आहे. दिलेल्या उद्दिष्टांपैकी एप्रिलपासून अद्याप २७ कोटींची पाणीपट्टी वसूल करण्यास विभागाला यश आले आहे. उर्वरित ३५ कोटी साडेतीन महिन्यांत वसूल करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. बहुतांश थकबाकीदारांकडून नोटिसांकडे गांभीर्याने बघितले जात नसल्यामुळे थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे. यामुुळे थकबाकीची रक्कम वसूल होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सहाही विभागांना आदेश
पाणीपुरवठा विभागाकडून पूर्व, पश्चिम, नाशिकरोड, सिडको, सातपूर, पंचवटी अशा सहाही विभागांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सहाही विभागांमधील मिळून सुमारे ३६ हजार मिळकतधारकांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. यात पाच हजारांहून अधिक यामध्ये पाच हजारांपेक्षा अधिक रक्कम थकलेल्या थकबाकीदारांचा समावेश आहे. नोटीस प्राप्त झाल्यानंतर देयकावरील थकीत रक्कम अदा न केल्यास संबंधितांना कुठलीही पूर्वसूचना न देता नळजोडणी तोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरातील अधिकृत नळजोडणीचा आकडा सुमारे १ लाख ९३ हजार इतका आहे.

Web Title: Notice to 36 thousand water tanker defaulters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.