महापौरांचा महापालिका प्रवेशद्वारावर आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:15 AM2018-10-20T01:15:32+5:302018-10-20T01:15:51+5:30

महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेवकांची त्यांच्या प्रभागातील कोणतीही विकासकामे होत नसल्याचे सांगत आक्रमक भूमिका घेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली. यात विरोधीपक्षासह सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक असल्याने महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावत नगरसेवकांना निधी मिळणार नसेल, त्यांची कामे होणार नसतील तर आपण स्वत: सभागृहाबाहेर आंदोलन करू, असा इशारा देत सत्ताधाऱ्यांची प्रशासनासमोर झालेली हतबलता दाखवून दिली.

 Notice of agitation on the entrance of mayor's municipal entrance | महापौरांचा महापालिका प्रवेशद्वारावर आंदोलनाचा इशारा

महापौरांचा महापालिका प्रवेशद्वारावर आंदोलनाचा इशारा

Next

नाशिक : महानगरपालिकेच्या महासभेत नगरसेवकांची त्यांच्या प्रभागातील कोणतीही विकासकामे होत नसल्याचे सांगत आक्रमक भूमिका घेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली. यात विरोधीपक्षासह सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक असल्याने महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावत नगरसेवकांना निधी मिळणार नसेल, त्यांची कामे होणार नसतील तर आपण स्वत: सभागृहाबाहेर आंदोलन करू, असा इशारा देत सत्ताधाऱ्यांची प्रशासनासमोर झालेली हतबलता दाखवून दिली.  महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेश वाटपात झालेली अनियमितता आणि निकृष्ट गणवेश वाटपाविरोधात आक्रमक भूमिका घेत प्रशसानाने शाळा एकत्रिकरण करताना स्थानिक नगरसेवकांना कोणतीही कल्पना न देता शाळा बंद करण्याचा आरोप करीत प्रशासन मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणीही मिळत नसून विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षणासोबतच आरोग्यही धोक्यात असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच शाळांच्या इमारती अणि सुविधा अपुºया असतानाच प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पटसंख्येत घट होत असून, १२८ शाळांपैकी केवळ ९० शाळांच उरल्या आहेत. या स्थितीला प्रशासान जबाबदार असल्याचा आरोप करतानाच शहरातील विविध प्रश्नांमध्ये लक्ष घालणाºया मुंढे यांनी सर्वसामान्य व गरीब नाशिककरांच्या भवितव्याचा विषय असलेल्या शाळांची स्थिती सुधारण्यासाठीही प्रयत्न करण्याची मागणी नगरसेवकांनी केली.
सभागृह नेता दिनकर पाटील यांनी गणवेश वाटप, विद्यार्थ्यांची गळती, शाळांमधील सुविधा यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर कल्पना पांडे यांनी आपल्याला विश्वासात न घेता परिसरातील शाळा बंद केल्याचा आरोप करतानाच रिकाम्या झालेल्या इमारतीचे प्रशासन काय करणार? असा सवाल उपस्थित केला. मुशीर सय्यद यांनी मागच्याच वर्षाच्या गणवेशांचे यावर्षी पुन्हा वाटप झाल्याचा आरोप केला. इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करण्याचा घाट घातला जात असून, असे झाल्यास या शाळांमधील विद्यार्थ्यांनी काय करायचे? असा प्रश्न शशिकांत शिंदे यांनी केला. दीड वर्षांत शिक्षण समितीची स्थापना का झाली नाही? असा प्रश्न सुधाकर बडगुजर यांनी केला. यावेळी विलास शिंदे, गजानन शेलार, अशोक मुर्तडक, गुरुमित सिंग बग्गा, सुदाम डेमसे, शाहू खैरे, हेमलता पाटील, योगेश शेवरे, प्रवीण तिदमे यांनी प्रभागातील प्रश्न मांडले.
महापौरांचा दुर्गावतार
नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात तक्रारींचा पाढा वाचल्यामुळे संतप्त झालेल्या महापौर रंजना भानसी यांनी प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी केली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा प्रश्न प्रशासनाने तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश देतानाच गणवेशाच्या गुणवत्तेची प्रयोगशाळेतून पडताळणी करून घेण्याचे आदेशही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. तसेच नुसतीच भाषणबाजी चालणार नाही, भाषण सर्वांना करता येते. त्यामुळे काम करण्याचा सल्ला देतांनाच सभागृहाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दमही महापौरांनी प्रशासनाला दिला.
आयुक्तांनी घेतली ‘शाळा’
शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती, इमारतींची दुरवस्था, स्वच्छतागृहांची अस्वच्छचा व गैरसोय यासोबतच शाळांचे एकत्रिकरण यांसारख्या विविध मुद्द्यांवर सभागृहात नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने महापौर रंजना भानसी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना खुलासा करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार आयुक्तांनी जवळपास महापालिकेतील शिक्षण व्यवस्थेसह राज्य, देश आणि जगभरातील शिक्षण व्यवस्था कशी आहे आणि ती कशी असायला हवी यावर तब्बल तासभर नगरसेवकांना व्याख्यान दिले. त्यामुळे आयुक्तांनी नगरसेवकांचे प्रश्न बाजूला ठेवून शाळाच भरविल्याची चर्चा सभागृहात रंगली.

 

Web Title:  Notice of agitation on the entrance of mayor's municipal entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.