भुजबळ यांच्या आर्मस्ट्रॉँगच्या भूखंडाला जप्तीची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:23 AM2018-04-12T00:23:30+5:302018-04-12T00:23:30+5:30
नाशिक : महाराष्टÑ सदन आणि अन्य अनेक घोटाळ्यांमध्ये अडकलेले राष्टÑवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांपैकी पुतणे माजी खासदार समीर भुजबळ तसेच सुपुत्र पंकज भुजबळ यांच्या मालकीचा आॅर्मस्ट्रॉँग कंपनीचा भूखंड जप्त करण्याची नोटीस नाशिकच्या नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेने बजावली आहे. त्यामुळे भुजबळ कुटुंबीयांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
नाशिक : महाराष्टÑ सदन आणि अन्य अनेक घोटाळ्यांमध्ये अडकलेले राष्टÑवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांपैकी पुतणे माजी खासदार समीर भुजबळ तसेच सुपुत्र पंकज भुजबळ यांच्या मालकीचा आॅर्मस्ट्रॉँग कंपनीचा भूखंड जप्त करण्याची नोटीस नाशिकच्या नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेने बजावली आहे. त्यामुळे भुजबळ कुटुंबीयांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिलापूर शिवारात असलेल्या या कंपनीकडे ४ कोटी ३४ लाख ४३ हजार १८३ रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेने ही जप्तीची नोटीस बजावली आहे. या कंपनीसाठी कर्ज काढताना नाशिक मर्चंट बॅँकेकडे जमीन गहाण ठेवण्यात आली होती. नाशिक तालुक्यातील सर्व्हे नंबर ७९५/ ३ पैकी २३ आणि ६ हे गट नंबर शेफाली भुजबळ तर ४ व ५ हे गट विशाखा भुजबळ यांच्या नावावर आहेत. या पाचही बिनशेती मिळकतीचे एकूण क्षेत्र ४ हजार २५० चौरसमीटर असून आॅफिसचे क्षेत्र ६००.४७ चौरसमीटर इतके आहे. थकबाकी भरण्यासाठी नाशिक मर्चंट बॅँकेने १ एप्रिल २०१७ पासून कर्ज परत फेड करण्यासाठी ६० दिवसांची मुदत दिली होती. त्यामुळे ९ एप्रिल रोजी कलम १३(४) नियम ९ अन्वये प्रतीकात्मक ताबा घेतला आहे. १ एप्रिल २०१७ पासून थकीत रकमेसह परतफेड करण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे.आर्मस्ट्रॉँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी असून, त्याचे समीर भुजबळ तसेच पंकज भुजबळ आणि सत्येन आप्पा केसरकर हे संचालक आहेत. भुजबळ यांच्या मालकीच्या चिपाड तसेच अन्य साहित्यापासून वीजनिर्मिती करणारी कंपनी सुरू झाली आणि नंतर बंदही पडली.