बाजार समित्या सुरू ठेवण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:41 AM2018-06-05T01:41:25+5:302018-06-05T01:41:25+5:30
शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बाजार समित्या बंद करण्याचे आदेश किसान सभेने दिले असले तरी, जिल्ह्णातील बाजार समित्यांचे व्यवहार पूर्ववत सुरू ठेवावेत असे आवाहन प्रशासनाने केले असून, प्रत्येक बाजार समितीला पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.
नाशिक : शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बाजार समित्या बंद करण्याचे आदेश किसान सभेने दिले असले तरी, जिल्ह्णातील बाजार समित्यांचे व्यवहार पूर्ववत सुरू ठेवावेत असे आवाहन प्रशासनाने केले असून, प्रत्येक बाजार समितीला पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. शेतकरी संपामुळे जिल्ह्णातील बाजार समित्यांमध्ये काही प्रमाणात आवक घटली असून, भाजीपाला व फळे वगळता कांदा व अन्य शेतमाल शेतकऱ्यांकडून आणला जात आहे. परंतु काही बाजार समित्यांमध्ये संपकरी शेतकºयांकडून लिलाव बंद पाडण्याचे प्रकार घडू लागल्याचे पाहून शेतकºयांनीच माल विक्रीसाठी आणणे बंद केले आहे. सोमवारी जिल्ह्णातील लासलगाव, देवळा, येवला, सटाणा, सिन्नर, उमराणे व कळवण या बाजार समित्यांमध्ये लिलाव होऊ शकले नाही, तर अन्य बाजार समित्यांमध्ये बºयापैकी आवक झाल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी बाजार समित्या बंद करण्याचे आदेश संपकरी संघटनांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर समित्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले असून, सहकार विभागाने बाजार समित्या सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच बाजार समितीतील माल व्यापाºयांना बाहेरगावी पाठवायचा असेल तर पोलीस बंदोबस्तात वाहने रवाना करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
नाशिक, मालेगावला चांगली आवक
रविवारच्या सुटीनंतर सोमवारी सुरू झालेल्या बाजार समित्यांमध्ये व्यवहार पूर्ववत दिसत असले तरी, शेतकºयांनी मालच न आणल्यामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव होऊ शकले नाहीत. फक्त नाशिकमध्ये ६४४५ क्विंटल, त्याखालोखाल मालेगावला १४२० क्विंटल व घोटीला ३१७ क्विंटल माल सोमवारी लिलावासाठी आणण्यात आला. अन्य बाजार समित्यांमध्ये किरकोळ मालाची आवक झाली.